Headlines

Ashish Vidyarthi यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया व्हायरल; अखेर त्या व्यक्त झाल्या…

[ad_1]

Ashish Vidyarthi First Wife’s CrypticPost after His Marriage : बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेता आणि खलनायक अभिनेता आशिष विद्यार्थी हे काल पासून त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहेत. वयाच्या 60 व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी कोलकाता येथील बिझनेसवुमन रुपाली बरुआशी लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर सगळ्यांचे लक्ष हे त्यांची पहिली पत्नी राजोशी बरुआ म्हणजेच पिलू विद्यार्थी यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता राजोशी यांनी शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

राजोशी बरुआ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे. या वेळी त्यांनी पहिली पोस्ट शेअर केली आहे. या पहिल्या पोस्टमध्ये “एखादी योग्य व्यक्ती तुम्हाला कधीच त्याच्यासाठी तुम्ही काय आहात, हा प्रश्न विचारणार नाही. त्याशिवाय तुम्हाला त्रास होईल, असं तो कधीच वागणार नाही. हे कायम लक्षात ठेवा”. 

Ashish Vidyarthi First Wife Post after His Marriage went viral on social media

राजोशी बरुआ यांनी दुसऱ्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की “कदाचित आता कोणत्याही गोष्टीचा अतिविचार आणि संशय या तुमच्या मनातून निघून गेल्या असतील. आता तुमच्या मनात गोंधळाऐवजी स्पष्टता असेल. तुमचे जीवन शांती आणि संयमाने भरलेले असेल. तुम्ही बऱ्याच काळापासून खूप खंबीर असाल आणि आता तुम्हाला आशीर्वाद मिळण्याची वेळ आली आहे. कारण तुम्ही त्यासाठी पात्र आहात.”

हेही वाचा : जेठा लाल होण्याआधी Dilip Joshi करत होते तुमच्याआमच्यासारखंच काम! 12 तास शिफ्ट अन्…

इतकंच काय तर राजोशी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राजोशी यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात एक सेल्फी शेअर करत त्या म्हणाल्या, आयुष्या नावाच्या कोड्यात अडकू नका. तर राजोशील आणि आशिष यांना एक मुलगा असून तो 23 वर्षांचा असल्याचे म्हटले जाते. तर त्यांची दुसरी पत्नी गुवाहाटी येथील असून ती एक फॅशन डिझायनर आहे त्यासोबत तिचं एक स्टोअर देखील आहे. 

दरम्यान, ईटाइम्सनं दिलेल्या एका वृत्तानुसार, लग्नानंतर आशिष विद्यार्थी हे आनंदी होते. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत म्हणाले, “या वयात रुपालीशी लग्न करणं, ही खूप सुंदर फिलिंग आहे. आम्ही सकाळी कोर्ट मॅरेज केलं. संध्याकाळी लग्नाचं रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे.” दरम्यान, आशिष यांनी आजवर फक्त बॉलिवूड नाही तर टॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *