अर्रर्र….; बॉलिवूड ‘हिरोईन’ला अतिउत्साह नडला, Attitude तोंडघशी पडला


मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्याचे दिवस आहेत, ते म्हणजे अगदीच नव्या जोमाच्या कलाकारांचे. म्हणजे शाहरुख, आमिर, यांच्यानंतर रणबीर, रणवीर आणि आता त्यांच्याही पुढची पिढी चित्रपट जगतामध्ये सक्रिय झालेली दिसत आहे. अभिनेत्यांप्रमाणेच अभिनेत्रींच्या बाबतीतही हेच चित्र. 

माधुरी, रवीनानंतर दीपिका- अनुष्का आणि आता अनन्या, जान्हवी, खुशी… आणि इतरही बऱ्याच नवोदित सौंदर्यवती या झगमगणाऱ्या विश्वात आपली ओळख तयार करताना दिसत आहे. नव्या पिढीचे काही चेहरे त्यांच्या आधीच्या पिढीला आदर्शस्थानी ठेवून पुढे जात आहेत. 

आपल्या आवडीच्या कलाकारांप्रमाणे वावरण्याचा प्रयत्न करत आहेत. असं असतानाच या नव्या जोमाच्या कलाकारांना त्यांचा अतिउत्साह नडतानाही दिसत आहे. अभिनेता चंकी पांडे याची लेक, अनन्या पांडे (Ananya Panday) हिच्यासोबत सध्या काहीसा असाच प्रकार घडला. (Bollywood Actress Ananya Pandays faild heroine Moment watch photo)

गेल्या काही दिवसांपासून अनन्या Liger या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये ती दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (vijay deverkonda) याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. हे सर्वकाही सुरु असतानाच अनन्या न चुकता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनही काही पोस्ट करत आहे. 

अशीच एक पोस्ट तिनं केली. जिथे एका फोटोसाठी काय काय पाहावं लागलं हेच सर्वांना तिनं सर्वांना सांगितलं आहे. मी “heroine moment” चा काहीसा अनुभव घेतानाच एकतर पक्ष्यांचे पंख माध्या केसांत अडकले किंवा मग तिचे केस ब्लोअरमध्ये अडकले. थोडक्यात काय, तर हिरोईन होण्याचा मोह अनन्याला आवरता आला नाही आणि या नादात तिच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आली.Source link

Leave a Reply