Headlines

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकरला संधी नाहीच, चाहत्यांची निराशा

[ad_1]

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 69 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवण्यात येत आहे. मुंबईने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. दिल्लीला प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.  मुंबईचा या मोसमातील हा शेवटचा सामना आहे. (ipl 2022 mi vs dc mumbai indians not give chance to arjun tendulkar debut in last match in 15 th season)

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) या मोसमातील शेवटच्या सामन्यात तरी आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळेल, अशी आशा चाहत्यांना होती.  मात्र या  शेवटच्या सामन्यातही अर्जुनला डेब्यू करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

अर्जुनचं मुंबई टीममधील दुसरं पर्व आहे. मात्र त्यानंतरही अर्जुनला संधी देण्यात आली नाही. अर्जुनला मुंबई फ्रँचायजीने 2021 मध्ये अर्जुनला 20 लाख या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं होतं. तर मुंबईने या 15 व्या हंगामात अर्जुनसाठी 30 लाख रुपये मोजले.

दरम्यान अर्जुनची आयपीएल डेब्यूची प्रतिक्षा आणखी लाबंणीवर पडली आहे. अर्जुनला आता पदार्पणासाठी आयपीएलच्या 16 व्या मोसमाची वाट पाहावी लागणार आहे. 

दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन-विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, सरफराज खान, मिचेल मार्श, रोवमन पावेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, खलील अहमद आणि एनरिक नॉर्खिया. 

मुंबई इंडियन्सची ‘पलटण’ : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेविस, रमनदीप सिंह, टिम डेविड, डेनियल सॅम्स, मयंक मार्कंडे, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह आणि रायली मेरेडिथ.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *