Headlines

Arjun Tendulkar | अर्जुनला टीम मॅनेजमेंट मोसमातील शेवटच्या सामन्यात संधी देणार?

[ad_1]

मुंबई : आयपीएलचा 15 वा मोसम आता जवळपास संपत आलाय.  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील अवघे काही सामने बाकी आहेत. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. मात्र या 15 व्या हंगामात मुंबईला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मुंबईचं या मोसमातील आव्हान केव्हाच संपुष्टात आलं. (ipl 2022 mi vs dc sachin tendulkar son arjun on bench watching everyone getting debut for mumbai indians may be replaced with jasprit bumrah) 

मुंबईचा या मोसमातील शेवटचा सामना हा शनिवारी 21 मे ला दिल्ली (Delhi Capitals) विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. मुंबईच्या या शेवटच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) पदार्पणाची संधी मिळू शकते.

अर्जुनला संधी मिळणार? 

अर्जुन मुंबई टीममध्ये 2021 पासून आहे. मुंबईने अर्जुनला 2021 मध्ये 20 लाख रुपयात गोटात घेतलं होतं. तर या 15 व्या मोसमासाठी अर्जुनला 10 लाख रुपये वाढवून दिले. मुंबई फ्रँचायजीने अर्जुनसाठी या मोसमात 30 लाख रुपये मोजले.

अर्जुन मुंबईत 2 वर्षांपासून आहे. मात्र त्याला अजूनही पदार्पणाची संधी मिळालेली नाही. अर्जुन आयपीएलच्या 14 व्या मोसमापासून ते आतापर्यंत एकूण 27 सामन्यांपासून पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहे.  मात्र त्याला डेब्यूसाठी ‘तारीख पे तारीख’ मिळाली.

दिल्ली विरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन? 

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबईची प्लेइंग इलेव्हन कशी असणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबईने या मोसमात प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी दिली. युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी स्वत: कायरन पोलार्डने विश्रांती घेतली. त्यानुसार या शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या जागी अर्जुनला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे अर्जुनला पदार्पणाची संधी मिळणार की पुढील मोसमाची वाट पाहावी लागणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *