मलायकासोबत ब्रेकअपच्या चर्चा होत असताना ‘या’ अभिनेत्रीसोबत अर्जुन कपूरचे प्रायव्हेट फोटो लिक


मुंबई : अर्जुन कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. मलायका अरोरासोबतचं नाते त्याने कधीही कोणापासून लपवलेलं नाही. मलायका घटस्फोटित असून तिला एक मुलगा आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघं सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अभिनेत्री तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता अर्जुन कपूरला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे. त्यांचं नातं कोणापासून लपलेलं नाही. काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या.  

अलीकडेच, बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचे असे काही फोटो समोर आले आहेत ज्यामुळे मलायका अरोरासह तिच्या चाहतेही हादरले आहेत.  या फोटोंमध्ये अर्जुन कपूर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत वेगळ्या अंदाजात दिसत आहे त्यानंतर त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा हिलाही मोठा धक्का बसला आहे.

अर्जुन कपूरने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्यामुळेच तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करतो. तसं, अर्जुन कपूरनेही अनेकवेळा सोशल मीडियावर आपले कुकिंगचं कौशल्य दाखवलं आहे. याशिवाय, तो त्याच्या चाहत्यांसोबत वर्कआउट व्हिडिओ देखील शेअर करतो ज्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांना फिटनेससाठी प्रेरित करतो.

दरम्यान, त्याने इंस्टाग्रामवर ‘द लेडी किलर’ चित्रपटाची सहकलाकार भूमी पेडणेकरसोबत काही फोटो आणि व्हिडिओही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत ज्यामध्ये अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर खूप रोमँन्टिक दिसत आहेत.

हे फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांनीही कमेंट सेक्शनमध्ये अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलायका अरोरा हिला टॅग करून कमेंट करायला सुरुवात केली आहे. यासोबतच अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर हिनेही त्याच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिली असून हे फोटो खूपच क्यूट असल्याचं सांगितलं आहे.

फोटोंमध्ये  अर्जुन कपूर आणि भूमी एकमेकांसोबत खूप खूश दिसत आहेत. सर्व चाहत्यांसाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे भूमी पेडणेकरच्या केसात पिवळं फूल आहे. यासोबतच अर्जुन कपूरच्या केसात पांढरं फूल असून दोघेही रोमँटिक स्टाईलमध्ये एकमेकांचे हात पकडून वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहेत.

या फोटोंमध्ये अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्या चेहऱ्यावर रोमँटिक स्टाईल असून दोघंही एकमेकांच्या डोळ्यात पाहत आहेत. एका फोटोत भूमी पेडणेकर अर्जुन कपूरच्या समोर उभी आहे आणि अर्जुन कपूरने तिला कंबरेला घट्ट पकडलं आहे.

 Source link

Leave a Reply