Arjun Kapoor सोबत लग्न कधी करणार? पाहा Malaika Arora काय दिले उत्तर


मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर (malaika arora and arjun kapoor) हे बॉलीवूडमध्ये सध्या चर्चेत असलेलं कपल आहे. बॉलिवूडचे अनेक कपल्स विवाहबंधनात अडकले आहेत. पण हे जोडपं कधी लग्न करताय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बी-टाऊन लव्ह बर्ड्सची धमाकेदार केमिस्ट्री पाहून चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे की मलायका आणि अर्जुन कायमचे एकमेकांचे हात कधी धरतील? (malaika arora and arjun kapoor marriage)

मलायका आणि अर्जुन कपूरच्या (malaika and arjun kapoor) सुंदर नात्याबद्दल बोलायचे झाले तर दोघेही अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट झाले आहेत. सुट्टीवर जाणे असो किंवा अवॉर्ड फंक्शनला जाणे असो, अर्जुन आणि मलायका नेहमीच एकमेकांसोबत सावलीसारखे असतात.

मलायका आणि अर्जुनचे लग्न कधी होणार?

मलायका आणि अर्जुनला त्यांच्या लग्नाच्या प्लॅनबद्दल अनेकदा विचारण्यात आले आहे. आपल्या आवडत्या जोडप्याचे लग्न पाहण्यासाठी चाहते इतके उत्सुक आहेत की, हा प्रश्न या जोडप्याचा पिच्छा सोडत नाही. आता एका नव्या मुलाखतीत मलायकाला पुन्हा एकदा विचारण्यात आले की ती अर्जुन कपूरसोबत कधी लग्न करणार?

लग्नाच्या प्रश्नावर मलायका म्हणाली- मला वाटते की लग्न ही खूप सुंदर घटना आहे. पण त्याच बरोबर मला असंही वाटतं की तुम्ही फक्त समाजाच्या दबावाखाली आहात म्हणून लग्नाची घाई करू नका. योग्य वाटेल तेव्हाच लग्न करा.

मलायका पुढे म्हणाली- अनेकवेळा पालक लग्नासाठी दबाव आणतात. जर तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल तर ही एक सुंदर भावना आहे. पण जेव्हा माझ्या लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा मला असे वाटते की मी अद्याप या प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार नाही.

अर्जुन मलायकाचा चांगला मित्र आहे

अर्जुन कपूरबद्दल बोलताना मलायका म्हणाली, अर्जुनसोबत माझे फक्त चांगले संबंध नाहीत, तर तो माझा चांगला मित्रही आहे. आपल्या जिवलग मित्रावर प्रेम करणे आणि प्रेमात पडणे महत्वाचे आहे. अर्जुन मला खूप चांगला समजतो. मला वाटते की आम्ही दोघेही एकमेकांचे सर्वात मोठे चीअरलीडर्स आहोत. मी अर्जुनशी काहीही बोलू शकते. रिलेशनशिपमध्ये असण्याची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जसे आहात तसे राहू शकता आणि मी जशी आहे तसे अर्जुनसोबत जगू शकते.

 Source link

Leave a Reply