अरेरे! लग्नाआधीच आई होणाऱ्या अभिनेत्रीसोबत कोणच काम करेना?


मुंबई : बॉलिवूडमध्ये जसजसा काळ बदलतो तसतसे नवे कलाकार जुन्या कलाकारांची जागा घेतात. ही परिस्थिती काही नवी नाही. पण, सध्या मात्र या कलाजगतामध्ये अशी परिस्थिती ओढावली आहे. एक काळ गाजवणाऱ्या, बोल्ड भूमिकाही अतिशय प्रभावीपणे साकारणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे नीना गुप्ता. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्रींच्या यादीत गणल्या जाणाऱ्या नीना गुप्ता यांनी साकारलेल्या बऱ्याच भूमिका सध्याच्या तरुणाईच्या मनावरही राज्य करतात. पण, आता मात्र त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Actress neena Gupta Claims Male Actor doesnt Wants To share screen Opposite Her)

नीना गुप्ता यांच्या सांगण्यानुसार सध्या त्यांच्याकडे चांगल्या चित्रपटांच्या ऑफर असल्या तरीही पुरुष कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यासाठी तयार नाहीत. बॉलिवूडमध्ये लिंग आणि वयाच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाबाबत त्यांनी आपलं स्पष्ट मत मांडत, माझ्याऐवजी कमी वयाच्या अभिनेत्रींना अभिनेते प्राधान्य देतात असं त्या म्हणाल्या. 

1982 मध्ये गुप्ता यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आणि एकाएकी त्या या झगमगाटापासून दिसेनाशा झाल्या. यानंतर 2018 मध्ये त्यांनी पुन्हा चित्रपटांकडे मोर्चा वळवला. 

माझ्यासोबत कोणालाही काम करायचं नाही… 
आपल्याकडे 2-3 आगामी प्रोजेक्ट असल्याचं सांगत ज्यावेळी नीना यांनी दिग्दर्शकांना सहकलाकार कोण आहे असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी माझ्याकडेच यासाठीचा पर्याय मागितल्याचं सांगितलं. ‘माझ्यासाठी हे अतिशय कठीण काम आहे, कारण सध्या कोणीही माझ्यासोबत काम करण्यासाठी तयार नाही’, असं त्या म्हणाल्या. यावेळी अभिनेता राम कपूर यानं वयामध्ये अंतर असतानाही आपल्यासोबत काम केल्याबद्दल त्यांनी रामचे आभार मानले. 

आपला समाज अजिबातच बदललेला नाही, असं म्हणताना अभिनेत्यांहून मी वयानं लहान दिसले तरीही त्यांना तरुण अभिनेत्रींशीच स्क्रीन शेअर करायचीये अशी खंत त्यांनी व्यक्त करत पितृप्रधान समाजावर ताशेरे ओढले. 

लग्नाआधीचं एकल मातृत्त्वं, त्यानंतर अभिनय क्षेत्रात तग धरण्यासाठीती धडपड आणि आता ही परिस्थिती असा नीना यांच्यासमोर असणारा अडचणींचा डोंगर काही त्यांच्यापासून दुरावत नाही हेच म्हणावं लागेल. 



Source link

Leave a Reply