अरेरे! आई- वडिलांच्या निधनातून सावरत नाही, तोच अभिनेत्यानं जुळ्या मुलांनाही गमावलं


मुंबई : आयुष्यात कोणत्याही गोष्टीची शाश्वती नसते, याची प्रचिती आपल्याला एखादा प्रसंग घडल्यावर येत असते. अशीच वेळ एका बॉलिवूड अभिनेत्यावर आली, ज्याच्यामुळं जीवनात झालेल्या आघातांशी जणून त्याची गट्टी जमली. 

ऐकायला हे कितीही सहज वाटत असलं, तरीही त्या अभिनेत्यानं या प्रसंगांचा सामना नेमका कसा केला हे त्याचं तोच जाणतो. जवळपास 10 वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर फरदीन खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. असं करत असताना आपल्यावर ओढावलेल्या प्रसंगांमधून तो सावरला नसल्याचं लगेचच लक्षात येत आहे. एका मुलाखतीतच त्याने याबाबतचा खुलासा केला. 

‘आईवडिलांच्या निधनानंतर मला स्वत:चा वेळ हवा होता. त्यांच्या निधनानंतर मी माझ्या प्रकृतीबाबतही घाबरलो होतो. पुढे मी आणि नताशानं मुलाचा निर्णय घेतला. पण, त्यातही अडचणी होत्या…’, असं फरदीन म्हणाला. 

सरतेशेवटी त्याच्या पत्नीनं आणि त्यानं आयवीएफच्या पर्यायाची निवड केली. ज्यासाठी तो परदेशात गेला. 

चांगल्या डॉक्टरांच्या साथीनं फरदीन आणि त्याच्या पत्नीला दोन जुळ्या मुलांचं पालकत्वं मिळालं. पण, अवघ्या सहा महिन्यांमध्ये त्यानं या मुलांना गमावलं. सहाजिकच या आघातानं तो आणि नताशा कोलमडले. 

सरतेशेवटी एका चिमुकलीनं त्याचं कुटुंब परिपूर्ण केलं आणि त्याच्या कुटुंबात आनंदाची बरसात झाली. 

Fardeen Khan | DNA India

2017 मध्ये त्याच्या या कुटुंबात एका मुलाचाही जन्म झाला आणि फरदीननं आणखी काही वर्षे, कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय घेतला. फरदीन सातत्यानं लंडनला प्रवास करत असल्यामुळं दरम्यानच्या काळात त्याला आपल्या कामावर लक्ष देता आलं नाही. 

पण, आता मात्र तो पुन्हा एकदा कलाजगतामध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता मुद्दा असा, की प्रेक्षक त्याला तितकंच प्रेम देतात का…. Source link

Leave a Reply