अरेच्चा !!! विकीशी लग्न करण्यासाठी कतरिनाची अट, पहिल्यांदाच मोठी माहिती समोर


मुंबईः बॉलीवूडमधील स्टार जोडी म्हणून ओळखले जाणारे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ डिसेंबरमध्ये विवाह बंधनात अडकले. अनेक दिवस त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या, मात्र अखेर हा शाही विवाह सोहळा राजस्थानमधील एका प्राचीन किल्ल्यात पार पडला.

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल आज पती-पत्नी आहेत, पण दोघांसाठी लग्न करणं इतके सोपं नव्हतं. कतरिनाची समजूत घालण्यासाठी विकीने खूपच मेहनत घेतली आहे. कॅटरिनाने विकीसमोर एक अट ठेवली होती, ती विकीने मान्य केल्यानंतरच विकी आणि कॅटचं लग्न होऊ शकलं.

यापूर्वी झालेल्या ब्रेकअपमुळे कॅटरिनाला विकीसोबत लग्न करण्याची खात्री नव्हती, त्यामुळे लग्नाचा प्रस्ताव स्वीकारण्यास तिला बराच वेळ लागला होता. कॅटरिनाला विकी आवडत होता. मात्र, विकीला ‘हो’ म्हणण्यापूर्वी तिने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती.

विकीने ही अट मान्य केल्यानंतरच कॅटरिनाने लग्नाला होकार दिला. ही अशी अट होती जी प्रत्येक मुलीची इच्छा असते, परंतु प्रत्येकजण ती पूर्ण करू शकत नाही.

कॅटरिनाने विकीकडून वचन घेतले की, विकीने आपल्याला जसं प्रेम आणि आदर दिला, तसंच प्रेम आणि आदर तो तिच्या कुटुंबालाही देईल. त्याने आपल्या आई आणि बहिणींना आपल्या कुटुंबाप्रमाणे वागवावे अशी कॅटरिनाची इच्छा होती. ही अट ऐकल्यानंतर कोणताही वेळ न घालवता विकीने अट मान्य केली.

विकी लग्नाआधी कॅटरिनाच्या कुटुंबाला नीट भेटलाही नाही, पण लग्नादरम्यान विकीचं तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत जबरदस्त बॉन्डिंग दिसून आले.

कॅटरिनाने आपली अट उघडपणे विकीच्या समोर ठेवली असेल, पण सहसा मुलींना हे जमत नाही, पण तिच्या कुटुंबालाही पूर्ण मान मिळावा, अशी तिची इच्छा असते.Source link

Leave a Reply