अरबाजच्या गर्लफ्रेंडसमोर मुलांनी दिली विचित्र पोझ, सोशल मीडियावर होतेय ट्रोल


मुंबई : अभिनेता सोहेल खानच्या (Sohail Khan)घटस्फोटाच्या बातम्या ताज्या असतानाचं, आता अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा एक  व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अरबाज खानची गर्लफ्रेंड अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानी हिच्या समोर काही मुलांनी विचित्र अॅक्शन करून तिच्या जवळ राहण्याचा प्रयत्न केला.या संबंधीत व्हिडिओ व्हायरल होत असून जॉर्जियाला ट्रोल केले जात आहे. 

व्हिडिओत काय ? 

जॉर्जिया अँड्रियानीचा (Giorgia Andriani) सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत ती मुलांनी घेरलेली दिसत आहे. जॉर्जिया निळ्या रंगाचा ड्रेस घालून कारमधून खाली उतरते. ती पुढे सरकत असताना काही मुले नाचत आणि गात असताना तिला घेरतात.
या परिस्थितीतून स्वतःला वाचवण्याचा ती प्रयत्न करते पण मुलांची मजा सुरुच असते, असे या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता.

 सोशल मीडियावर ट्रोल 

जॉर्जियाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक लोक तिला ट्रोलही करत आहेत. बरेच नेटकऱ्यांचं असं म्हणणं आहे की, जॉर्जियाचे त्या मुलांसोबतचे वर्तन अतिशय चूकीचे होते. तिने मुलांसोबत असे वागायला नको होते.    

कोण आहे जॉर्जिया ? 

जॉर्जिया अँड्रियानी एक इटालियन मॉडेल आणि डान्सर आहे. अरबाज खानसोबतच्या तिच्या अफेअरमुळे ती नेहमी चर्चेत असते.अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी लग्नाच्या 19 वर्षानंतर घटस्फोट घेतला. या घटस्फोटानंतर अरबाज खान (Arbaaz Khan) आणि जॉर्जिया रिलेशनशिपमध्ये आले. 

घटस्फोटानंतर अरबाज खान जॉर्जियाला डेट करत होता. दोघांच्या वयात 22 वर्षांचा फरक असल्याची माहिती आहे. जॉर्जिया 30 वर्षांची आहे आणि अरबाज खान 52 वर्षांचा आहे. Source link

Leave a Reply