Headlines

अरबाजचं ‘त्यांच्यावर’ अवलंबून राहणं मलायकाला खटलं, या आणि अशा अनेक कारणांमुळे घेतला घटस्फोट

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड कलाकार मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाज खान (Arbaaz Khan) यांचा २०१७ साली घटस्फोट झाला. घटस्फोटाला चार वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरीही त्यांच्या नात्याची आजही चर्चा होत आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्यात नेमकं कोणत्या कारणामुळे वाद झाला. (Malaika Arora and Arbaaz Khan split divorce real reason) जो वाद इतका विकोपाला गेला की, त्यांच्यात घटस्फोट झाला. 

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचं १९९८ लग्न झालं. या दोघांना १९ वर्षांचा मुलगा आहे. ज्याचं नाव अरहान खान (Arhaan Khan) 

मलायकाचा घटस्फोट २०१७ साली झाला असला तरीही मलायका आणि अर्जुन कपूर यांच्यातील नातं हे २०१६ पासून सुरू झालं. 

मलायका आणि अरबाज आजही आपल्या मुलासाठी अनेकदा एकत्र येतात. एकत्र फिरताना दिसतात. त्यांच्यात बोलणंही होतं. मात्र मलायका आणि अरबाज यांच्यात नेमकं असं काय झालं की हा वाद घटस्फोटापर्यंत गेला. 

घटस्फोटामागचं प्रमुख कारण 

मलायका ही खूप स्वावलंबी आहे. २३ ऑक्टोबर १९७३ साली जन्मलेली मलायका मॉडेल, अभिनेत्री, डान्सर म्हणून ओळखली जाते.

मलायका अरोरा ११ वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती आईसोबत राहू लागली. 

लहानपणापासूनच मलायका कष्ट करत होती. खूप कमी वयात तिने मॉडेलिंगला सुरूवात केली. 

१९९८ साली मलायकाने ‘दिल से’ सिनेमातील ‘छैया छैया’ गाण्यावर परफॉर्म केलं. यानंतर ती लोकप्रियतेच्या दिशेने वाटचाल करू लागली. 

मलाका आणि अरबाजची एका जाहिराती दरम्यान ओळख झाली. यानंतर दोघांनी लग्न केलं. 

अरबाज खान कधीच आर्थिकदृष्ट्या स्थिर नव्हता. यामुळे ती कायमच दुःखी असायची. 

अरबाज हा कायम आपल्या कुटुंबावर अवलंबून असल्याचं तिला आढळलं. 

मलायका अगदी सुरूवातीपासूनच मेहनती मुलगी होती. अरबाजने अनेकदा बॉलिवूडमध्ये आपलं नशिब अनुभवलं. पण तो कायमच अपयशी ठरला. 

तर दुसऱ्या बाजूला सलमान खान बॉलिवूडमध्ये स्वतःच स्थान निश्चित करत होता. त्याची लोकप्रियता देखील वाढत होती. 

अरबाजने यानंतर सलमान खानच्या सिनेमांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. अरबाज कायमच त्याच्या लहान भावावर अवलंबून होता. 

मात्र दुसरीकडे मलायका अरोरा प्रगती करत होती. मलायका लोकप्रिय मॉडेल आणि डान्सर म्हणून लोकप्रिय होत होती. ती अनेक ब्रँडची ब्रँडऍम्बॉसिडर होती. तसेच ती अनेक रिऍलिटी शोमध्ये जज म्हणून काम करत होती. 

मलायका या दिवसांत लोकप्रिय होत होती. स्वावलंबी होत होती. मात्र अरबाज आपल्या कुटुंबावर पूर्णपणे अवलंबून होता. हेच या दोघांच्या घटस्फोटातील प्रमुख कारण ठरलं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *