Headlines

अरबाज-मलायका पुन्हा एकदा एकत्र? अभिनेत्याने केलं मोठं विधान; एकच चर्चा

[ad_1]

Arbaaz Khan-Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा (malaika arora) आणि अरबाज खान (arbaaz khan) एकमेकांपासून घटस्फोट घेतल्यानंतर आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे, तर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. 18 वर्षांनंतर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर अरबाज आणि मलायकाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.  (Malaika Arora Arbaaz Khan Relation)

पण घटस्फोटानंतरही दोघांना मुलगा अरहानसाठी (Arhan Khan) एकत्र येताना पाहिलं. घटस्फोटानंतरही अरबाज मलायकाने मुलगा अरहानसाठी चांगली मैत्री ठेवली. पण आता दोघांच्या नात्याने नवीन वळण घेतल्याचं दिसून येत आहे. अरबाजच्या एका वक्तव्यामुळे तुमच्याही भुवया उंचावतील. आता खुद्द अरबाज खानने मलायकासोबतच्या बाँडवर मौन सोडलं आहे. माजी पत्नी मलायका अरोरासोबत तो कोणत्या प्रकारचा बाँड शेअर करतो हे अभिनेत्याने सांगितलं.

आम्ही दोघं एकमेकांना आधीपेक्षा जास्त समजून घेतो, अरबाज
अरबाज खानने एका मुलाखतीत मलायका अरोरासोबतचा घटस्फोट आणि सध्याच्या बाँडबद्दल सांगितलं. अरबाजने मुलाखतीत सांगितलं की, मलायका आणि तो आता एकमेकांना पूर्वीपेक्षा जास्त समजून घेतात. सिद्धार्थ काननसोबत बोलताना अरबाज म्हणाला की, ते एकमेकांच्या आवडीनिवडींचं कौतुक करतात. अरबाज पुढे म्हणाला, गेल्या काही वर्षांत आम्ही खूप परिपक्व झालो आहोत. आता आम्हा दोघांनी एकमेकांना पूर्वीपेक्षा जास्त समजून घ्यायला आणि स्वीकारायला सुरुवात केली आहे.

अभिनेता पुढे म्हणाला, आम्ही दोघांनीही आमच्या आयुष्यात प्रगती केली आहे. जीवनातील गोष्टी आपण स्वीकारतो. माझ्याबद्दल अनेक गोष्टी आहेत ज्या तिने स्वीकारल्या आहेत आणि तिच्याबद्दल अनेक गोष्टी आहेत ज्या मी स्वीकारल्या आहेत.

मलायका अरबाजला एक अद्भुत व्यक्ती मानते
याआधी मलायकानेही अरबाजसोबतच्या तिच्या बाँडवर मौन सोडलं होतं. मलायका म्हणाली होती की, आता आमचं समीकरण चांगलं आहे. आम्ही नेहमीपेक्षा अधिक बोल्ड आहोत. आम्ही आता अधिक आनंदी आणि शांत आहोत. अरबाज एक अद्भुत व्यक्ती आहे. मला त्याला आयुष्यात आनंदी बघायचं आहे. कधीकधी लोक चांगले असतात, परंतु त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं चांगलं चालत नाही. मी नेहमी त्यांच्यासाठी चांगला विचार करेन.

मलायका आणि अरबाज दोघंही आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघंही रोजच चर्चेत असतात. मलायका आणि अर्जुन कपूर आता बी-टाऊनचं आवडतं कपल बनलं आहे. तर दुसरीकडे अरबाजलाही त्याची लेडी लव्ह भेटली आहे. अरबाज जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघंही आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *