Headlines

दडशिंगे येथील दडशिंगे ते राज्य मार्ग जोड रस्ता ग्रामीण मार्गासाठी निधि मंजूर

बार्शी – मौजे दडशिंगे येथील दडशिंगे ते राज्य मार्ग जोड रस्ता ग्रामीण मार्ग 49 ची  सुधारणा करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्या निधीतून जिल्हा वार्षिक योजना 2021-22 मध्ये लेखाशिर्ष 3054 ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण करणे. यासाठी रुपये 10 लाख मंजूर करण्यात आले आहेत . तसेच ग्रामीण मार्ग 48 कव्हे दडशिंगे रस्त्याची सुधारणा करणे साठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत . असा प्रशासकीय आदेश प्राप्त झाला आहे. 

सदर जोड रस्ता अत्यंत खराब आणि नादुरुस्त झाला होता . यामुळे गावची दळणवळण या मुख्य रस्त्यावर होतं होती. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते सदर मंजुरी मुळे ग्रामस्थांतुन समाधान व्यक्त होतं आहे .या मंजुरी साठी खासदार ओमराजे निंबाळकर , पालकमंत्री दत्ता मामा भरणे, दडशिंगे गावचे सरपंच सचिन गोसावी यांचे विशेष प्रयत्न आणि योगदान राहिले आहे .अशी माहिती विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख पांडुरंग घोलप यांनी माहिती दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *