माफी मागितली म्हणून अभिनेत्रीला शिक्षा; असं कुठे घडलं?


Big Boss 16 Update Tina Dutta: बिग बॉस (Big Boss Show) हा शो सध्या सगळीकडे धुमाकूळ घालतो आहे. या प्रसिद्ध शोनं आत्तापर्यंत त्याची लोकप्रियता कायम ठेवली आहे. सध्या बिग बॉसचा हा सोळावा (BB S6) सिझन सुरू झाला आहे. यावेळी हा शो इतर सिझनेपक्षा वेगळा असणार आहे. (television actress tina dutta punished for saying sorry in the big boss house) 

1 ऑक्टोबरपासून या शोचं नव पर्व सुरू झालं आहे. परंतु हा शो सुरू झाल्या झाल्याच या शोमध्ये नव्या वादाची ठिणगी पडली आहे. ही ठिणगी पडली ती चक्क नॉमिनेशन टास्कमुळे. (Nomination in BigG Boss House) या घरातील सदस्यांसाठी नॉमिनेशन टास्क फारच कडक केली असून नॉमिनेशन टास्कच्या नियमांचे पालन झाले नाही तर सदस्यांना शिक्षा होऊ शकते. 

नेमकं काय घडलं? या प्रकरणात नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा तुम्हालाही असेल. पहिल्या नॉमिनेशनमध्ये (First Nomination in Bigg Boss) बिग बॉसनं सांगितलं की जर कुणी दुसऱ्याला नॉमिनेट करताना ठोस कारण दिलं नाही तर त्याला शिक्षा केली जाईल. ही शिक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे असेल.

त्याप्रमाणे नॉमिनेशन टास्क सुरू झाला परंतु टीना दत्ता (Tina Dutta), मान्या सिंग (Manya Singh) आणि सौंदर्या (Soundarya) यांनी घरातील सदस्यांना ठोस कारण दिलं नाही आणि त्यांनी सॉरी म्हटले. यावरून बिग बॉस यांना राग आला आणि त्यांनी या तिघांना शिक्षा दिली (Bigg Boss Punishment). ही शिक्षा अशी होती की त्यांनी संपुर्ण घराची कामं करायची आहेत. 

बिग बॉसच्या घरात सध्या वादांच्या ठिणग्या पडला आहेत. त्याची सुरूवातच नॉमिनेशनपासून झाली असली तरी मध्यंतरी पलंगावरूनही काही वाद (Fight in Bigg Boss House) झाले होते. सध्या बिग बॉसचा हा नवा सिझन चांगलाच लोकप्रिय होताना दिसतो आहे. आता या नव्या सिझनमध्ये सलमान खान (Salman Khan) पहिली कोणाकोणाची शाळा घेणार याची प्रेक्षकांना आतुरता आहे. 

 

 Source link

Leave a Reply