Headlines

Anushka Sharma बॉलिवूडमधून घेणार ब्रेक? म्हणाली “मला अभिनय आवडतो पण…”

[ad_1]

Anushka Sharma Will Take Break From Bollywood : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सध्या तिच्या कान्स डेब्यूमुळे चर्चेत आहे. अनुष्काचा कान्स डेब्यू हा तिच्यासारखा क्लासी होता असं म्हणायला हरक नाही. तिचे कान्समधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. एकीकडे कान्सची चर्चा सुरु असताना दुसरीकडे अनुष्का तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत अनुष्कानं केलेल्या वक्तव्यामुळे ती बॉलिवूडमधून ब्रेक घेणार का असा सवाल तिच्या चाहत्यांना पडला आहे. अनुष्का यावेळी म्हणाली की ती आता जास्त संख्येत चित्रपट करणार नसून तिच्या मुलीसोबत वेळ व्यथित करणार आहे. 

इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या माहितीनुसार, एका कार्यक्रमात अनुष्का आता जास्त चित्रपट करणार नसून मुलीला वेळ देणार यावर बोलली आहे. त्याविषयी बोलताना अनुष्का म्हणाली की “मला अभिनय करताना खूप आनंद होतो, पण ज्याप्रमाणे मी आधी सतत चित्रपट करायचे तसे मी आता करणार नाही. मला एका वर्षात एकच चित्रपट करायचा आहे आणि त्यासोबत अभिनय करण्याची जी प्रोसेस आहे त्याचा आनंद घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं मला माझ्या आयुष्यात समतोल आणायचा आहे, जे मी सध्या माझ्या कुटुंबाला आणि कामाला देणाऱ्या वेळेत करत आहे.”

पुढे आयुष्य कसं हवं आहे याविषयी बोलताना अनुष्का म्हणाली, “सध्या मी आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आहे आणि जसं माझं आयुष्य आहे ज्यात मी आनंदी आहे. याशिवाय मला कोणाला एक आई, एक अभिनेत्री, एक आयडल म्हणून काहीही सिद्ध करून दाखवायचं नाही. मला फक्त तेच करायचं आहे ज्यातुन मला आनंद मिळतो आणि जे करत असताना ते योग्य आहे असं मला वाटतं. मी तेच करते जे मला योग्य वाटतं. मला इतरांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.” 

अनुष्का आणि विराट यांची जोडी ही सेलिब्रिटी कपल्समध्ये लोकप्रिय आहे. 2017 साली अनुष्का आणि विराटनं सप्तपदी घेतल्या तर 2021 साली त्यांना मुलगी झाली असून तिचं नाव वामिका असं आहे. 

हेही वाचा : Gaurav More नं ‘हास्यजत्रे’तून घेतला ब्रेक? फोटो शेअर करत म्हणाला…

अनुष्कानं केलेल्या या वक्तव्यानंतर ती आता करिअरमधून ब्रेक घेणार आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. आता भविष्यात अनुष्का नक्की काय करेल हे आपल्याला नंतर कळेल. अनुष्काच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच आपल्याला ‘छकडा एक्सप्रेस’ या चित्रपटातून भेटायला येणार आहे. या चित्रपटात ती झुलन गोस्वामी यांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *