Anushka Sharma Pregnant : अनुष्काच्या गरोदरपणाची चर्चा जोरात; आता या VIDEO ला काय म्हणावं?


Anushka Sharma Pregnant : अभिनेत्री (Bollywood Actress Anushka sharma) अनुष्का शर्मा हिनं करिअरमध्ये अपेक्षित उंची गाठल्यानंतर क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याच्याशी लग्नगाठ बांधली. वयाच्या अमुक एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर तिनं खासगी आयुष्याला महत्त्वं दिलं. यामध्ये तिचा संसार असो किंवा मग मुलीचा जन्म. अनुष्कानं घेतलेल्या अनेक निर्णयांचा चाहत्यांना कायमच हेवा वाटला. चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापासून ते निर्मीती संस्थेच्या माध्यमातून चित्रपटांना आर्थिक पाठबळ देण्यापर्यंत बऱ्याच गोष्टींमध्ये तिनं नशीब आजमावलं. 

एक अभिनेत्री असण्यासोबतच तिनं पत्नी आणि आई अशा भूमिकांनाही न्याय दिला. अशा या अनुष्काचं नाव गरोदरपणामुळं पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे. काय म्हणता अनुष्का पुन्हा गरोदर? वामिका (Vamika) इतकी लहान असताना अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार? तुम्हालाही असे प्रश्न पडताहेत का? 

थांबा. तसं काहीच नाहीये. अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर नाहीये पण, ती सध्या तिच्या गरोदरपणाच्या गप्पांमध्ये आणि आठवणींमध्ये मात्र रमल्याचं पाहायला मिळत आहे. हल्लीच पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान अनुष्कानं वामिकाच्या वेळी गरोदर असतानाचे दिवस आठवले. डोहाळे म्हणजे नेमकं काय, यावरून तिनं पडदा उचलला (Pregnancy cravings). 

सोशल मीडियावर व्हायरल होतोय अनुष्काचा तो व्हिडीओ 

(Anushka Sharma Video) अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जिथं ती गरोदरपणाच्या दिवसांमध्ये नेमका कोणता पदार्थ तिला सतत खावासा वाटत होता यावरून पडदा उचलला. सुरुवातीला हे डोहाळे वगैरे काय असतं यावर तिचाही विश्वास नव्हता. कारण, तिला असं काहीच वाटत नव्हतं. पण, त्यानंतर मात्र एक वेळ अशी आली, जेव्हा अनुष्काला एकाएकी सकाळदुपार एकच पदार्थ खावासा वाटत होता. तो पदार्थ म्हणजे मुंबईचा वडापाव (Vadapav). 

अनुष्का लॉकडाऊन काळात गरोदर होती. पण, मुंबईतच वास्तव्यास असल्यामुळं तिला वडापाव मिळवणं  फारसं कठीण नव्हतं. त्यामुळं तिनं या पदार्थावर मनसोक्त ताव मारला होता. गरोदरपणाच्या काळातील हे दिवस आठवले की अनुष्का आजही हसते. 

वामिकाच्या बाबतीत बरीच सावध असते अभिनेत्री 

अनुष्का किंवा विराट या दोघांपैकी कुणीही आजपर्यंत त्यांच्या लेकीचा चेहरा जगासमोर आणलेला नाही. सोशल मीडियावर तिचा अधिकृत फोटोसुद्धा पोस्ट करण्यात आलेला नाही. किंबहुना ज्यावेळी वामिकाचे काही फोटो व्हायरल झाले होते त्यावेळी तिनं संतप्त प्रतिक्रिया देत ही बाब आपल्याचा मुळीच पटली नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. थोडक्यात लेकिबद्दल अनुष्का सर्वतोपरी सावधगिरी बाळगताना दिसते. एक आई म्हणून तिचं कुठं काय चुकलं? Source link

Leave a Reply