Headlines

…अन् महाराष्ट्रातील ‘या’ भाजपा आमदाराने निर्मला सीतारमन यांच्यासमोरच पत्नीला उचलून घेतलं; केंद्रीय अर्थमंत्री पाहतच राहिल्या | bjp mla lifts wife to enter pune jejuri temple in front of nirmala sitharaman rahul kool kanchan kool scsg 91

[ad_1]

देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मिशन बारामतीअंतर्गत निर्मला सीतारमन या पुणे, पुरंदर आणि बारामतीमध्ये वेगवगेळ्या ठिकाणी दौरे करुन कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाचं चित्र दिसत आहे. मात्र या दौऱ्यामधील राजकीय आरोप प्रत्यारोपांबरोबरच इतर कारणांनीही दौरा चर्चेत आहे. दोनच दिवसांपूर्वी मोबाईल फोनवर सेल्फी काढण्यावरुन निर्मला सीतारमन यांनी एका कार्यकर्त्याला सर्वांसमोर झापल्याचा प्रकार घडल्यानंतर आता आणखीन एका कारणाने निर्मला यांचा दौरा चर्चेत आला आहे. भाजपाच्या एका आमदाराने केंद्रीय अर्थमंत्र्यांसमोरच आपल्या पत्नीला उचलून घेतल्याचं चित्र निर्मला यांच्या पुरंदरमधील भेटीदरम्यान पहायला मिळालं.

नक्की पाहा >> ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी : निर्णयानंतर CM शिंदे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले अन्…; पाहा Video

नेमकं घडलं काय?
झालं असं की, शुक्रवारी निर्मला सीतारमन यांनी जेजुरी गडाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आणि भाजपाचे आमदार राहुल कुलही उपस्थित होते. तसेच राहुल यांच्या पत्नी कांचन या सुद्धा यावेळी पत्नीसोबत आल्या होत्या. यावेळी कुल यांनी जेजुरीला येणाऱ्या नवदाम्पत्याकडून केल्या जाणाऱ्या प्रथेप्रमाणे आपल्या पत्नीला उचलून घेत पाच पावलं चालले. सामान्यपणे कोणतंही नवविवाहित जोडपं जेजुरीला गेल्यानंतर पती पत्नीला पाच पायऱ्या उचलून घेतो. निर्मला यांना प्रथेसंदर्भात माहिती देताना राहुल कुल यांनी कांचन यांना उचलून घेतलं. हा सर्व प्रकार निर्मला या मागे उभ्या राहून पाहत होत्या. यापूर्वीही एकदा राहुल कुल यांनी अशाच प्रकारे आपल्या पत्नीला जेजुरीच्या मंदिराच्या पायऱ्या चढताना उचलून घेतलं होतं.

नक्की वाचा >> शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”

राहुल कुल कोण?
राहुल कुल हे २०१९ च्या आधी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार होते. नंतर त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपामध्ये प्रवेश केला. दौंड मतदारसंघामधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवून ते निवडून आले.

कांचन कुल कोण?
कांचन कुल यांची ओळख सांगायची झाल्यास बारामती लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंविरोधात २०१९ मध्ये निवडणूक लढवण्याऱ्या भाजपाच्या उमेदवार अशी सांगता येईल.

नक्की वाचा >> सुप्रिया सुळेही बसल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर? शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादीचं ‘CM खुर्ची प्रकरण’ पोहचलं पोलिसांपर्यंत

सुप्रिया यांनी ही निवडणूक ६ लाख ८६ हजार ७१४ मतांसहीत जिंकली होती. मात्र कांचन यांनी त्यांना कडवी झुंज देत ५ लाख ३० हजार ९४० मतं मिळवली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *