Headlines

Kantara च्या चित्रीकरणादरम्यान घडलेला विचित्र अपघात; पाहून अंगावर काटाच येईल

[ad_1]

Kantara Movie : ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’ (Kantara) या चित्रपटानं स्थानिक प्रेक्षकांवरच नाही, तर संपूर्ण जगातील सिनेरसिकांवर छाप पाडली. (Kantara on ott platform) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारत ऋषभ शेट्टीनं (Rishabh shetty) उभा केलेला ‘शिवा’ आणि एका प्रथेभोवती फिरणारं कथानक पाहता महिन्याभराहून अधिक काळ उलटूनही हा चित्रपट Housefull होताना दिसत आहे. जागतिक स्तरावर आतापर्यंत या चित्रपटानं 400 कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. 2022 या वर्षात Box Office hit म्हणून या चित्रपटाकडे संपूर्ण कलाजगत पाहत आहे. 

तुम्हाला माहितीये का….? 

तुम्हाला माहितीये का? या चित्रपटासाठी दिग्दर्शक आणि मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या ऋषभ शेट्टी यानं जीवाची बाजी लावली होती. किमान निर्मिती खर्चात कमाल मेहनत आणि तितक्याच कलात्मक मंडळींची साथ त्याला या चित्रपटाच्या निमित्तानं मिळाली होती. 

शेवटची 15 मिनिटं म्हणजे चित्रपटाचा जीव 

Kantara Climax बाबत सध्या बरंच बोललं जात आहे. गावकरी आणि खलनायकांमध्ये होणारा संघर्ष आणि त्या क्षणाला शिवाच्या अंगात संचारणारा दैव, प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. हे दृश्य चित्रीत करणं ऋषभसाठी प्रचंड आव्हानाचं काम होतं. त्याविषयी सांगताना त्यानं काही अशा गोष्टींचाही खुलासा केला जे ऐकून तुम्हालाही धडकी भरेल. (Kantara climax video)

तो विचित्र अपघात 

‘ही दृश्य कठीण होती. कारण, त्यासाठी आम्ही 360 शॉट्स आणि पावसांचे शॉट्स लावले होते. तिथं पाणी नेणंही कठीण होतं. त्यामुळं गावातील विहिरीतूनच पाणी घेतलं होतं. चित्रीकरण संपेपर्यंत विहिरीतील सर्व पाणी संपलं होतं’, असं सांगत त्यानं पुढे जे सांगितलं ते अंगावर काटा आणणारं होतं. (Kantara Climax Accident)

‘चित्रीकरणादरम्यान माझे खांदे त्रास देऊ लागले होते. 360 डिग्री शॉटच्या वेळी माझा एक खांदा जागेवरून हलला होता (Shoulder Dislocate). दुसऱ्याच दिवशी माझा दुसरा खांदाही डिसलोकेट झाला होता. दोन्ही खांदे जागचे हलले असूनही मला चित्रीकरण मात्र सुरुच ठेवावं लागलं होतं’, असं तो म्हणाला. 

इतकी गंभीर दुखापत असतानाही ऋषभनं मोठ्या ताकदीनं अभिनय केला आणि या पात्रामध्ये जीव ओतला. त्यानं साकारलेला अखेरच्या दृश्यातील दैव जणू प्रत्यक्षात कोणती शक्तीच होती असंही ऋषभ सांगतो. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *