Headlines

Angaraki Chaturthi 2023 : आज पहिली अंगारकी चतुर्थी, ‘या’ राशींवर लक्ष्मीची कृपा तर चुकूनही करु नका ‘ही’ कामं

[ad_1]

Angarki Sankashti Chaturthi 2023 : या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी असल्याने भाविकांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंगळवारच्या दिवशी चतुर्थी आल्यास तिला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. आजच्या अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे कारण आज सर्वार्थ सिद्धी योग आला आहे. त्यामुळे काही राशींवर लक्ष्मीची कृपा होणार आहे. तर आजच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करु नका अन्यथा तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. 

शुभ मुहूर्त 

अंगारकी चतुर्थी 10 जानेवारीला दुपारी 12 वाजून 9 मिनिटांनी सुरु होईल आणि 11 जानेवारीला दुपारी 2 वाजून 31 मिनिटांनी संपेल. (Angarki Sankashti Chaturthi 10th january 2023 do not make these mistakes and these zodiac signs can get huge money shubh muhurta pooja vidhi marathi news)

चंद्रोदय कधी होईल?

1 0 जानेवारीला चंद्रोदयाची वेळ रात्री 9 वाजून 11 मिनिटांची दिली गेली आहे.

‘या’ राशींवर लक्ष्मीची कृपा

ज्योतिषशास्त्रानुसार आजच्या दिवशी मंगळ आणि गणरायाची कृपा काही राशींवर दिसून येणार आहे. वृषभ, वृश्चिक आणि मिथुन राशींना आर्थिक लाभ होणार आहे. 

संकट चतुर्थीवर भाद्रची सावली

आजची अंगारकीला विशेष महत्त्व आहे. एकीकडे सर्वार्थ सिद्धी योग आहे तरदुसरीकडे आज सकाळी  7:15 पासून भद्रकाल सुरु झाला आहे. हा भद्रकाल रात्री 12:09 असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार भद्राकाळात शुभ कार्य होतं नाहीत. त्यामुळे आज पूजा करताना चुकूनही या गोष्टी करु नका. 

ही कामं करु नका!

आज काळे कपडे घालू नयेत. या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणं शुभ मानलं जातं. 

आज गणेशाची पूजा करण्याबरोबरच चंद्राला अर्घ्य अर्पण करणेही खूप महत्त्वाचं आहे. चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही. पण या दरम्यान चंद्राला अर्घ्य देताना पाण्याचे शिंतोडे पायावर पडू नयेत हे लक्षात ठेवा.

आजच्या दिवशी कथा वाचल्याशिवाय उपवासाचे पूर्ण फळ मिळणार नाही. 

आजच्या दिवशी गपणतीला तुळशीची पाने अपर्ण करु नयेत. तर बाप्पाला दुर्वा आणि पिवळ्या-लाल रंगाची फुले अर्पण करावीत. 

आजच्या दिवशी तामसिक अन्नाचं सेवन करू नये. तुमचा उपवास नसला तरी लसूण, कांदा, मांसाहार आणि अल्कोहोल इत्यादींचं सेवन चुकूनही करु नका. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *