‘पती आणि लेकीचा फोटो…’, Alia Bhatt ची नवी पोस्ट पाहून चाहते आनंदी


Alia Bhatt new Photo : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या सर्वत्र चर्चत आहे. आई झाल्यानंतर आलियाच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांची नजर असते. बॉलिवूड स्टार कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) यांच्या बाळाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. आलियाने लग्नाच्या दोन महिन्यांनंतर सोशल मीडियावर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यानंतर कपूर, भट्ट कुटुंबासोबत चाहते देखील रणबीर आलियाच्या बाळाच्या (Ranbir Alia baby girl) प्रतीक्षेत होते.

अखेर आलिया भट्टनं 6 नोव्हेंबर 2022 ला एका गोंडस मुलीला जन्म दिला आणिआलिया – रणबीर आता आई-वडिलांच्या भूमिकेत आले. आई झाल्यानंतर आलियाने पहिली पोस्ट केली होती. फोटोमध्ये एक कप होता आणि त्यावर ‘Mama’ असं लिहिलं होतं. आलियाची ती पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली. (alia bhatt new movie)

वाचा : आई झाल्यानंतर Alia Bhatt इन्स्टाग्रामवर सक्रिय, खास फोटो पोस्ट करत म्हणाली…

आता पुन्हा आलीयाने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये आलियाने पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. स्वेट टॉपमध्ये आलियाने बोल्ड पोज दिली आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ‘cosy’ असं लिहिलं आहे. 

आलियाच्या फोटो चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे (alia bhatt baby reveal). एका युजरने कमेंटमध्ये ‘तुझ्या पती आणि बेबीचा फोटो दाखव प्लिज….’ असं लिहिलं आहे. सध्या आलियाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (alia bhatt ranbir kapoor)

महत्त्वाचं म्हणजे आई झाल्यानंतर आलियाने स्वतःचा पहिला फोटो पोस्ट केल्यामुळे सोशल मीडियावर अभिनेत्रीला पाहून चाहते आनंदी आहेत. सध्या आलियाच्या नव्या फोटोची चर्चा सर्वत्र आहे. (alia bhatt daughter name)

मुलीच्या जन्मानंतर आलिया-रणबीरचा मोठा निर्णय

आलिया आणि रणबीर बाळाला सर्वांपासून दूर ठेवू इच्छितात. कारण तिला कोणताही संसर्ग होऊ नये. बाळ (alia bhatt and ranbir kapoor baby) अजून लहान आहे, अशा परिस्थितीत तिला अनेक प्रकारचे संसर्ग होऊ शकतात.  म्हणून सध्या कोणताही पाहुणा किंवा सेलिब्रिटी आलिया-रणबीरला भेटायला येऊ नये असं वाटतं.Source link

Leave a Reply