Headlines

“आनंद दिघेंसोबत ज्या घटना घडल्या त्याचा मी साक्षीदार, योग्य वेळी नक्की बोलेन,” एकनाथ शिंदेंचे मोठे विधान | eknath shinde said will tell sometimes what happened with anand dighe

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेमध्ये उघड दोन गट पडले आहेत. या बंडामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात टोकाचा संघर्ष निर्माण झाला आहे. शिंदे गटाने खरी शिवसेना आम्हीच आहोत, असा दावा केल्यामुळे दोन्ही गट एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसत आहेत. असे असताना शिंदे यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटावर घणाघाती टीका केली. सध्या मुलाखती दिल्या जात आहेत. पण मी जेव्हा मुलाखत देईन देव्हा राज्यात आणि देशात भूकंप होईल असे शिंदे म्हणाले आहेत. ते मालेगावमध्ये संभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावरही भाष्य केले आहे. दिघेंसोबत काय झाले ते योग्य वेळी नक्की सांगेन, असेही शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत खूप काही झालं. सिनेमा हे फक्त उदाहरण आहे. दिघे यांच्या जीवनामध्येही ज्या घटना घडलेल्या आहेत, त्याचा मी साक्षीदार आहे. मी योग्य वेळी नक्की बोलेन,” असे एकनाथ शिंदे भर सभेत म्हणाले.

हेही वाचा >> राज्यपालांच्या विधानावर संभाजी छत्रपतींनी नोंदवाला आक्षेप, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली ‘ही’ मागणी

पुढे बोलताना शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे मुखपत्र सामना या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीवरही टीका केली. “मी आज जाहीरपणे काही गोष्टी बोलणार नाही. पण योग्य वेळी बोलेन. सध्या मुलाखतींचा सपाटा सुरु आहे. पण मी जेव्हा मुलखत देऊन तेव्हा राज्यात नव्हे तर देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही. आरोप प्रत्यारोप करणे माझ्या स्वभावात नाही,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> दहीहंडी उत्सवानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी, राज्य सरकारची घोषणा

“आपण भाजपासोबत निवडणूक लढलो. लोकांनी आपल्याला कौल दिला. जनमत दिले. भाजपासोबत आपण सत्ता स्थापन करण्याऐवजी आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रिपद मिलवले. गद्दारी तुम्ही केली की आम्ही केली,” असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *