Amruta Fadanvis Video : उपमुख्यमंत्र्यांचीच पत्नी करते सरकारी प्रॉपर्टीचा गैरवापर, अमृता फडणवीस ट्रोल


Amruta Fadanvis Video : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांची पत्नी अमृता फडणवीस (Amrta Fadanvis) या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अमृता फडणवीस या नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं मत मांडताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यांचे हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं असून त्याच्यावर अनेक रील देखील व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर अमृता यांचा असाच एक रील व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे अमृता फडणवीस यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. 

अमृता फडणवीस यांच्या या गाण्याचं नाव ‘आज मै मूड बना लेया’ असे आहे. याच गाण्यावर अमृता फडणवीस यांनी हूक स्टेप करतानाचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी टिकटॉक स्टार बरोबर ठेका धरला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओलाही चाहत्यांची पसंती मिळत आहे. रियाझ अली (Riyaj aly) असं या टिकटॉक स्टारचं नाव आहे. अमृता फडणवीस यांच्याबरोबरच्या डान्सचा व्हिडिओ रियाझ अलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. रियाझ अलीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचा एक फोटोही त्याच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. 

अमृता आणि रियाझच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘देवेंद्र फडणवीस जी हे काय चालू आहे हिंदुत्वाचा डंका तुम्ही वाजवता आणि मुसलमानासोबत मॅडम नाचतात.’ दुसरा नेटकरी म्हणाला की, ‘हिंदू संस्कृती च दर्शन म्हणावं का याला, पूछता हैं भारत.’ तिसरा नेटकरी म्हणाला की, ‘देवेंद्र फडणवीस यांनी विष पिऊन घ्यावे.’ आणखी एक नेटकरी म्हणाला की, ‘उपमुख्यमंत्र्यांची पत्नी सरकारी प्रॉपर्टीचा गैरवापर करत आहे.’ 

हेही वाचा : Pakistani Actor चा Kajol सोबत लिपलॉक; अभिनेता म्हणाला, ‘आम्ही अनेक…’

कोण आहे रियाझ अली?

Riyaj aly हा एक भारतीय रिल स्टार आहे. अवघ्या 18 व्या वर्षात त्याने सोशल मीडियावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रिजाझ अलीचा जन्म भूतानमध्ये झाला. पण तो पश्चिम बंगालमध्ये आला. आज त्याचे करोडो भारतीय चाहते आहेत. रियाझ अलीचे इन्स्ट्राग्रावर जवळपास 24 मिलिअन फॉलोअर्स आहेत. रिल स्टारबरोबरच तो मॉडल आणि फॅशन ब्लॉगरही आहे. त्याचं नेटवर्थ जवळपास 80 लाख इतकं आहे. 

आज मै… गाण्याला लाखो व्ह्यूज

अमृता फडणवीस यांचं नुकतंच प्रदर्शित झालेलं गाणं बॅचलर पार्टीतील कथानकावर आधारित असून ‘आज मैंने मूड बना लिया ए ए ए , तेरे नाल ही नचना वे’ असे या गाण्याचे बोल आहेत. आपल्या नव्या गाण्यात अमृता फडणवीस या वेगवेगळ्या लूकमध्ये पाहिला मिळत असून त्यांनी गायनाबरोबर डान्सही केला आहे. प्रदर्शित झाल्यापासून गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. याआधी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर अमृत फडणवीस यांनी गाणं गायलं होतं.Source link

Leave a Reply