Headlines

अमृता खानविलकरने ‘चंद्रमुखी’ सिनेमासाठी वाढवलेलं वजन कसं केलं कमी? जाणून घ्या

[ad_1]

मुंबई : सध्या सगळीकडेच ‘चंद्रमुखी’ सिनेमाची जोरदार चर्चा आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी सिनेमा  २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अमृता खानविलकर चंद्राच्या भुमिकेत झळकणार आहे तर, आदिनाथ कोठारे खा. दौलतराव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? सिनेमासाठी अमृता खानविलरने बरीच मेहनत घेतली आहे. यातलंच महत्वाचं म्हणजे अमृताने या सिनेमाठी वजन वाढवलं होतं. या सिनेमासाठी दिग्दर्शक  प्रसाद ओकनं एक अटही घातली होती. आजच्याआमच्या या खास रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला याच्याबद्दल सांगणार आहोत.

चंद्रा साकारण्यासाठी प्रसाद ओकनं घातली ‘ही’ अट
चंद्रमुखीची गाणी पाहताना अमृताचं वजन वाढल्याचं दिसंत आहे. चंद्रासाठी अमृतानं तब्बल आठ किलो वजन वाढवलं होतं.

आम्हाला दिलेल्या मुलाखती अमृतानं सांगितलं, “माझ्या दिग्दर्शकाने प्रसाद ओकने मला आधीच सांगितलं होतं की, मला तू बारीक, नको आहेस. मी आयुष्यात पहिल्यांदा वजन वाढवलं होतं. जवळपास आठ किलोंनी माझं वजन वाढलं होतं. जेव्हा मी शूटिंग सुरू केलं. तेव्हा मी जवळ-जवळ 60 किलोंची होते. माझं आयुष्यात इतकं वजन कधी वाढलं नव्हतं. मी 50-55 या रेंजमध्ये असायचे. पण माझ्या दिग्दर्शकाची तशी अटच होती की, नऊवारीमध्ये चंद्राचा बांधा सुबक दिसायला हवा. म्हणून हे वजन वाढवलं.”

“मी खूप खाल्लं, झोपले आणि थोडंफार वर्क आउट केलं. मजेत गेली दोन वर्षं…छान सगळं गोड, तुपातलं खाल्लं आणि चंद्रा साकारायला तयार झाले. दोन वर्षं मी हे वजन मेन्टेन केलं होतं. चित्रपट शूट झाला, डबिंगला आम्ही सुरूवात केली त्यानंतर मी वजन कमी करायला सुरूवात केली.”

अमृता खानविलकरचा फिटनेस फंडा
अमृता खानविलकरची बारीक फिगर सगळ्यांनीच पाहिली. लवचिक अंग, आणि सडपातळ बांधा फक्त अभिनेत्रींकडेच नाही, तर ती आपल्याकडेही असू शकते. त्यासाठी फक्त अभिनेत्रींसारखं खाणं-पिणं आणि व्यायाम करण्याची गरज असते. पण ब-याचदा सेलेब्स फक्त प्रोटिन डाएट किंवा हाय-फायबर ड्रिंक घेत असतील असा आपला गैरसमज असतो.

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या फिगरच गुपित आहे, तिचं घरातलं आणि मराठी पध्दतीचं जेवणं. त्यामुळेच अमृता सारखी फिगर आता आपलीही बनू शकते. अमृता खानविलकरने दिलेल्या ह्या डाएट आणि खाण्या-पिण्याच्या टिप्स

अमृता देतेय व्यायामाच्या टिप्स-
शरीराला रोज व्यायामाची नितांत आवश्यकता आहे. आपण माणूस असल्याने, आपण व्यायामाशिवाय चिरतरूण राहणे शक्य नाही हे लक्षात ठेवा. आणि रोज न चुकता व्यायाम करा. सकाळी जमत नसेल तर संध्याकाळी करा. जीममध्ये जा, किंवा घरच्या घरी करा. मी रोज दोन तास न चुकता व्यायम करते. आणि मगच माझ्या दिवसाची सुरूवात होते. व्यायामाने चेह-यावर आपोआप तजेला येतो. कारण तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स घामावाटे निघायला मदत होते.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *