Amravati Murder Case: उमेश कोल्हे हत्या प्रकरण काय आहे? का होतंय उदयपूर हत्याकांडाशी तुलना?


Amravati Murder Case: उदयपूरमधील कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. दरम्यान, उदयपूरप्रमाणेच महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अमरावती शहरात राहणाऱ्या उमेश कोल्हे या केमिस्टची 21 जून रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. तब्बल 12 दिवसांच्या तपासानंतर अमरावती शहर पोलिसांनी या हत्येमागे नुपूर शर्मा यांची पोस्ट व्हायरल केल्यामुळे हत्या केल्याचं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी हत्येचा मास्टरमाईंड इरफान शेखला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

पोलिसांनी केलेल्या चौकशीत असं आढळून आलं आहे की,  19 जून रोजी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी शोएब खान भुर्या हा त्याच्या एका साथीदारासह उमेशला मारण्यासाठी गेला होता. पण घाबरल्याने त्या दिवशीचा प्रयत्न फसला. त्यानंतर 20 जूनला पुन्हा एकदा उमेश मारण्यासाठी रात्री साडे नऊ वाजता दुकानाजवळ गेला. मात्र त्या दिवशी उमेश लवकरच दुकान बंद करून गेल्याने पुन्हा प्रयत्न फसला. मात्र तिसऱ्यांदा 21 जून रोजी 5 लोकं एकत्र गेले. त्यापैकी 3 जणं बाईकवर होते, तर दोघे जण उमेश कुठे पोहोचला यांची माहिती देत होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवल्याचं ट्वीट केल्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.  

या प्रकरणी पोलिसांनी मास्टरमाईंड इरफान शेख याच्यासह सात जणांना अटक केली आहे. मुदास्सीर अहमद (22), शाहरुख पठाण (25), अब्दुल तौफिक (24), शोएब खान (22), आतिब राशिद (22) आणि युसुफ खान (44) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींना अमरावती कोर्टात हजर केलं असता 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

उदयपूर हत्याकांड प्रकरण नेमकं काय?

कन्हैयालाल यांचे उदयपूरमधील भूतमहलजवळ सुप्रीम टेलर्स नावाचे दुकान आहे. कन्हैया लाल हे गोवर्धन विलास परिसरात राहत होते. टेलर कन्हैया लाल यांनी 10 जून रोजी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. कन्हैया लाल विरुद्ध 11 जून रोजी धानमंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाझीम अहमद नावाच्या व्यक्तीने गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कन्हैया लालला 12 जून रोजी अटक करून कोर्टात हजर केले. 13 जून रोजी कोर्टात हजर झाल्यानंतरच कन्हैया लालला जामीन मिळाला होता. 15 जून रोजी जामिनावर सुटलेल्या कन्हैयालालने जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याची तक्रार केली होती.  त्यानंतर 28 जून रोजी दोन तरुण कपडे शिवण्याच्या बहाण्याने त्याच्या दुकानात आले. आरोपींनी कन्हैया कुमारवर हल्ला करून त्यांची हत्या केली.Source link

Leave a Reply