Headlines

अमिताभ बच्चन यांना शेवटचं भेटून घ्या….; डॉक्टरांनी जया बच्चन यांना का दिला असा सल्ला?

[ad_1]

Amitabh Bachchan Jaya Bachchan : जेव्हा लग्नानंतर आपल्या आयुष्यात पावलोपावली साथ देणाऱ्या व्यक्तीचा प्रवेश होतो तेव्हा गोष्टी 360 अंशानं बदलतात. बऱ्याचदा ती व्यक्तीच आपल्यासाठी आपलं विश्व होऊन जाते. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांचं नातंही असंच काहीसं. दोघांचंही एकमेकांवर नितांत प्रेम, म्हणूनच की काय कोणा एकालाही इजा पोहोचली तर दुसऱ्याच्या मनात लगेचच कालवाकालव होते. 

बच्चन जोडप्यानं प्रेमाची परीक्षा घेणारा असाच एक क्षण अनुभवला… 
साधारण 39 वर्षांपूर्वी ती घटना घडली होती. जेव्हा 1982 मध्ये मनमोहन देसाई यांच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणाऱ्या ‘कुली’ (Coolie) या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना जबर मार लागला होता. (Bengaluru) बंगळुरूपासून 16 किमी अंतरावर असणाऱ्या सेटवर हा अपघात झाला होता.  (once jaya bachchan asked to meet amitabh bachchan for the last time post his accident on the sets of coolie)

चित्रपटातील हिंसक दृश्याच्या चित्रीकरणावेळी पुनीत इस्सर यांनी जबर मुक्का मारला आणि तो बच्चन यांच्या पोटात लागला. पुढे अमिताभ यांनी दुसरीकडे उडी मारणं अपेक्षित होतं. पण, वेळ चुकली आणि टेबलाचा कोपरा त्यांच्या पोटावर लागला. मार इतका जबर होता, की त्यांनी लगेचच चित्रीकरण सोडून हॉटेल गाठलं. वेळ जात होता तसतशा वेदनाही वाढल्या आणि अखेर बिग बींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

2015 मध्ये एका ब्लॉगमधून त्यांनी या अपयगाताविषयी माहिती दिली होती. 8 दिवस उपचार होऊनही त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा नव्हता. परिस्थिती इतकी वाईट होती, की डॉक्टरांनीही सर्व आशा सोडल्या होत्या. हे सर्व इतक्या असह्य वळणावर आलं होतं की जया बच्चन (Jaya Bachchan) यांना ICU मध्ये पाठवताना, पतीला शेवटचं पाहून घ्या असं सांगण्यात आलं होतं. 

 

डॉक्टर उड़वाड़िया यांनी एक अखेरचा प्रयत्न केला आणि त्यांनी सलग कॉर्टिसन इंजेक्शन दिले. तो क्षण चमत्काराहून कमी नव्हता, कारण तेव्हाच त्यांच्या पायाचा अंगठा हलला होता. जया बच्चन यांनीच ही दृश्य पहिल्यांदा पाहिली, आणि ‘देखों, वो ज़िंदा है’ असं म्हणत त्यांनी किंकाळी मारली. 

जवळपास 2 महिन्यांनंतर बिग बी (Amitabh bachchan) अपघातातून सावरत घरी परतले. तेव्हा पहिल्यांदाच त्यांनी वडील हरिवंशराय बच्चन (Harivansh rai bachchan) यांना रडताना पाहिलं होतं. लेक मृत्यूच्या जबड्यातून परतल्यामुळं परमात्म्याचे आभार मानण्यासाठीच जणू त्यांनी अश्रूंचा मार्ग निवडला होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *