अमिताभ बच्चन यांच्यावर भाळल्या ‘त्या’ 4000 जणी; बेभान होत ऐन मतदानावेळी केली करामत


मुंबई : देशातील महत्त्वाच्या पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी हाती आले. मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक राज्यामध्ये आणि संपूर्ण देशातच यासंदर्भातली उत्सुकता पाहायला मिळाली. त्यात भर टाकली आणखी एका चर्चेनं. ही चर्चा होती, थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबाबतची. (Election Results Amitabh bachchan)

एकाएकी तो काळ अनेकांनाच आठवला, जेव्हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी राजकारणात पदार्पण केलं होतं. निवडणुकांच्या रिंगणात ते उतरलेही होते. 

पण, जेव्हा मतं देण्याची वेल आली तेव्हा मात्र अशी गोची झाली की खुद्द निवडणूक आयोगही हादरला. 

नेमकं प्रकरण काय ? 

1984 लोकसभा निवडणुकांमध्ये अमिताभ बच्चन काँग्रेसच्या वतीनं अलाहबादमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांना ज्येष्ठ नेते हेमवती नंदन बहुगुणा यांची टक्कर होती. 

अतिशय अटीतटीच्या अशा या निवडणुकीमघ्ये महिला मतदारांनी निशाणीचा शिक्का मारण्याऐवजी अमिताभ बच्चन यांच्यासाठी लिपस्टीकनं कागदावर ठसे उमटवत ही मतं दिली होती. 

हे चाहत्यांचं प्रेम असलं तरीही ही 4 हजार मतं रद्दबातल करण्यात आली. सर्वांनाच वाटलं होतं की बच्चन यांना ही निवडणूक जिंकता येणार नाही. पण, असं झालं नाही. 

हेमवती यांना बिग बींकडून  1 लाख 87 हजार मतांनी पराभूत व्हावं लागलं. हा निकाल समोर आला आणि हेमवती यांच्यासाठी हा हादरा होता. राजकारणातून काढता पाय घेत त्यांनी पुढे कधीच निवडणूक लढवली नाही. 

इथे अमिताभ बच्चन यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये हा विजय सर्वात मोठा आणि तितकाच लक्षात राहण्याजोगा ठरला. Source link

Leave a Reply