Amitabh Bachchan यांना आवडते ही स्टार किड, KBC मध्ये केला खुलासा

[ad_1]

Amitabh Bachchan Revels His Favourite Star Kid : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अमिताभ हे सध्या कौन बनेगा करोडपतीचे सुत्रसंचालन करत आहे. यंदाचं KBC चं 14 वं पर्व आहे. अमिताभ हे त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात.

यावेळी शोमध्ये गुजरातच्या सुरत येथील वैभवी भरतभाई पडोद्रा हॉटसीटवर बसल्या होत्या. यावेळी स्पर्धकानं अमिताभ यांना सांगितले की ‘त्यांची आवडती अभिनेत्री आलिया भट्ट आहे.’ यावर पुढे बोलत अमिताभ म्हणाले ‘ती फक्त तुमची नाही तर माझी देखील फेव्हरेट आहे.’

आवडत्या अभिनेत्रीचा विषय कसा निघाला?  

20 हजार रुपयांचा प्रश्नावर अमिताभ बच्चन यांनी वैभवी यांना प्रश्न विचारला होता की आता जे गाणं वाजेल ते कोणत्या चित्रपटातलं आहे हे ओळखा? गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील एक ऑडिओ क्लिप प्रे करण्यात आला.वैभवीने हे गाणे लगेच ओळखले आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की आलिया भट्टने या चित्रपटात काम केले आहे आणि ती तिची आवडती अभिनेत्री आहे.

सगळ्यांचा आवडता आणि आपल्याला किती गोष्टी माहित आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक हा शो पाहतात. दरम्यान, हा क्विझ शो लवकरच संपणार आहे. दरम्यान, शो संपण्याआधीच प्रेक्षकांना पुढच्या सीझनची आतुरता लागली आहे. तर सोशल मीडियावर लोक चर्चा करत आहेत की अमिताभ यांचे वय झाल्यानं पुढच्या वर्षी सुत्रसंचालक बदलण्याचा निर्माते विचार करू शकतात.

हेही वाचा : कशाला हो…? बोल्ड ड्रेसमध्ये Ankita Lokhande ला अडचणीत पाहून नेटकऱ्यांनाच पडला प्रश्न

कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (KIFF) उद्घाटन कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली होती. महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी अमिताभ बच्चन यांनी नागरी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषयावर विशेष भाष्य केलं केलं. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात अमिताभ बच्चन आणि जया यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनही (Abhishekh Bachchan) उपस्थित होता. अभिनेत्री राणी मुखर्जी, गायक अरिजित सिंग आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र, सध्या शाहरूख आणि अमिताभ यांच्या केमेस्ट्रीची चर्चा होताना दिसत आहे. (Kbc 14 amitabh Bachchan reveals alia bhatt is his favourite actress)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *