Headlines

अनुपम खेर यांच्या डोक्यात यशाची हवा गेल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांना असं जमिनीवर आणलं…

[ad_1]

मुंबई :  अनुपम खेर (Anupam Kher actors) हे हिंदी चित्रपट (Bollywood cinema ) सृष्टीतले नावाजलेले अभिनेते. त्यांनी 500 हून अधिक चित्रपटांत आणि 100हून अधिक नाटकांत काम केले आहे. ते पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थाचे अध्यक्षही राहिले आहेत (President of Film and Television Association of India) अनुपम खेर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या वेगवेगळ्या पात्रांनी मोठे स्थान मिळवले आहे. ते परखड बोलण्यासाठी देखील ओळखले जातात. काही वर्षांनी त्यांना अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत आखरी रास्ता या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटादरम्यान त्याच्यासोबत अशी घटना घडली की त्याच्यातील अहंकार पूर्णपणे नष्ट झाला.

चित्रपटमध्ये पदार्पण करताच अनुपम खेर हे नाव बॉलीवूड गाजलं, चांगल्या अभिनेत्यांपैकी त्यांचं एक नाव बनलं. पण त्याचा त्यांना अभिमानही होता. परंतु चित्रपटातील यशाने खेर यांना प्रचंड इगो आला होता. याविषयी अनुपम खेर यांनी स्वतः अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी संबंधित किस्सा सांगितला. तसेच बच्चन यांनी त्यांची मानसिकता बदलून जमिनीवर कसं आणलं हे देखील खेर यांनी सांगितलं.

अनुपम खेर यांचा पहिला चित्रपट 1984 मध्ये आला होता आणि 1987 पर्यंत ते खूप यशस्वी झाले होते. यशामुळे त्यांच्या डोक्यात खुपच हवा गेली होती. चित्रपटांतील यश म्हणजे तुम्ही सामान्य जीवनापासून दूर होऊन पंचतारांकित पार्ट्यांमध्ये बुडून जाता. चित्रपटातील ऐषोआराम, सामान्य जीवनाशी तुमचे नाते तुटू लागते. अहंकाराच्या सीमा वाढू लागतात. त्यांनी सांगितले की त्यांची कीर्ती इतकी वाढली होती की त्यांना यश हाताळता आले नाही.

मद्रासमधील शुटिंग आणि एसी

अनुपम खेर हे आखरी रास्ताच्या (aakharee raasta) शूटिंगदरम्यान मद्रासला (Madras Shooting) गेले होते. त्यावेळी मेकअप रूममधला (makeup room) एसी काम करत नसताना खेर यांचा सिग्नेचर ट्यून सुरू झाला. त्यावेळेस ते म्हणाले की मॅनेजरला बोलवा. मॅनेजर आल्यानंतर खेर यांनी एसीबाबत मॅनेजरला फटकारले. माझा एसी लागत नाही?  हे वाईट आहे. पंख्याची हवा वेगळी आणि एसीची वेगळी. माझा अभिनय (acting) एसीशिवाय येत नाही. ऐवढं झाल्यानंतर त्यांनी मॅनेजरला विचारलं की माझा पहिला सीन कोणासोबत आहे? मॅनेजर यांनी नम्रपणे सांगितला की अमिताभ बच्चन(Amitabh) यांच्याशी तुमचा सीन आहे. हे मॅनेजरनी सांगितल्यानंतर  खेर यांनी विचारलं की ते कुठे आहेत. त्यावर त्यांनी सांगितले की अमिताभ वेळेवर 10 वाजता आले होते, तुम्ही उशीरा आलात. खेर रागाच्या भरात मॅनेजरला म्हणाले तु मला शिकू नकोस?  कुठे आहेत ते?

शुटिंग सुरु होण्याच्या आधी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे एका कोपऱ्यात पॅन्ट, शर्ट, ब्लँकेट, दाढी (pants, shirt, blanket, beard) आणि मिशा (Misha)घालून बसले होते आणि पुस्तक वाचत होते. खेर यांनी अमिताभ बच्चन यांना विचारलं की या उन्हात तुम्ही घोंगडी, कोट, दाढी, मिशा, विग वगैरे घातले आहे. तुम्हाला गरम होत नाही का? त्यावर बच्चन यांनी खेर यांच्याकडे पाहून म्हणाले मी उष्णतेचा विचार केला तर जाणवते, मी विचार केला नाही तर जाणवत नाही. या घटनेनंतर अनुपम खेर यांनी पुन्हा कधीही एसी आणि इतर सुविधांसाठी कोणावरही आरडा-ओरड केली नाही. त्यावेळेपासून अनुपम खेर हे नेहमी जमिनीवरच राहतात.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *