Shark Tank मध्ये अमिताभ बच्चन यांचा समावेश, पाहा काय आहे सत्य?


मुंबई : आजकाल सोशल मीडियावर ‘शार्क टँक इंडिया’ या प्रसिद्ध शोचे अनेक व्हिडिओ आणि मीम्स व्हायरल होत आहेत. अलीकडेच या शोमधील  सर्व जज कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचले आणि त्यांनी खूप धमाल केली.

या शोमध्ये कपिल शर्माने अश्नीर ग्रोव्हर (भारतपे), नमिता थापर (एमक्योर फार्मास्युटिकल्स), अनुपम मित्तल (शादी डॉट कॉम), विनिता सिंग (शुगर कॉस्मेटिक्स), अमन गुप्ता (बोट), गझल अलघ (ममाअर्थ) आणि पीयुष बंसल (लेन्सकार्ट) या कंपनींचे को फाऊंडर या सगळ्यांना भेटले आणि त्यांच्यासोबत खास एपिसोड शूट केला.

कपिल शर्माच्या शोमध्ये ‘शार्क टँक’च्या सर्व परिक्षकांनी आपली गोष्ट सांगितली. अलीकडेच, या शोचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अनेक न ऐकलेल्या गोष्टी समोर आल्या आहेत.

या शोमध्ये कपिल शर्माने नमिता थापर यांना अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक प्रश्न विचारला आहे.  कपिल शर्मा म्हणाला, तुम्ही अमिताभ बच्चन यांच्या फॅन आहात, जेव्हा बिग बींनी तुमची संपत्ती पाहिली, तेव्हा ते तुमचे फॅन झाले असतील ना?

यावर उत्तर देताना नमिता हसल्या आणि म्हणाल्या, ‘बच्चन साहेबांनी माझं संपूर्ण आयुष्यच संपवून टाकलं आहे. मला त्यांच्याशिवाय दुसरं कोणी आवडत ही नाही. 

यावर शुगर कॉस्मेटिक्सच्या सह – संस्थापक विनीता सिंह म्हणाल्या, शार्क टँक इंडियाचे अनुपम काहीसे अमिताभ बच्चन यांच्या प्रमाणेच दिसतात. त्या म्हणाल्या, हे नॅच्युरल आहे, ‘तुम्हाला वाटत नाही का?’ 

विनीता यांच्या सांगितलेल्या गोष्टींचा विचार करत कपिल म्हणाला, अनुपम अमिताभ यांच्याप्रमाणेच बसले आहेत.

Amitabh Bachchan - Wikipedia

परिक्षकांमधील या सगळ्या संवादामुळे अमिताभ बच्चन यांचं ही नाव शार्क टँक इंडिया सोबत जोडलं जाऊ लागलं. आणि त्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. नमिता थापर या बिग बींच्या मोठ्या फॅन आहेत. त्यामुळे बिग बींची शार्क टँकसोबत चर्चा होऊ लागली होती.Source link

Leave a Reply