Headlines

आमीरच्या बहिणीचा 60 व्या वर्षीही बोल्ड आणि रोमँटिक अंदाज, कॅमेऱ्यासमोर केलं ‘ते’ कृत्य

[ad_1]

Amir Khan Sister : मिस्टर परफेक्टशनिस्ट आमीर खानचा ‘लाल सिंग चढ्ढा’ काही दिवसांनी प्रदर्शित होतो आहे. त्यातून सध्या हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पण तरीही आमीर खान सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. नुकत्याच त्याने ‘लाल सिंग चढ्ढा’चा एक प्रमियर शो आयोजित केला होता. 

सध्या आमीर खान त्याच्या या आगामी चित्रपटात व्यस्त असला तरी आमीरने खास फॅमिली टाईम काढला आहे. नुकताच आमीरने त्याच्या मोठ्या बहीणीचा निखत हेगडे हिचा 60 वा वाढदिवस साजरा केला. आमीरच्या बहीणीच्या बर्थडे सेलिब्रेशनला आयरा खान, आझाद राव खान ( किरण राव आणि आमीर खानचा मुलगा) आणि अन्य परिवारीतील सदस्य उपस्थित होते. 

निखत हेगडे यांच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. आमीरची बहीण आपल्या नव्या अवतारात दिसली यावेळी तिने स्ट्रॅपी ड्रेस घातला होता. स्वत: निखत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या पार्टीची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये त्याच्या समोर टेबलवर केक ठेवलेले आहेत. त्याची आई त्याच्या शेजारी बसली आहे आणि आमिर खानही जवळच उभा आहे.

व्हिडिओमध्ये केक कापल्यानंतर निखत त्यांच्या आईला केक खाऊ घालते आणि नंतर त्यांच्या मुलीला केक भरवते. आपल्या मुलीला केक भिरवल्यानंतर निकत त्यांच्या पतीला केक भरवतात आणि त्यांना किस करतात. आमीर खानही तिथे आपल्या बहीणीला शुभेच्छा द्यायला हजर असून त्याने आपल्या बहीणला केक खाऊ घातला आहे.  

आमीर खानला आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशीदेखील आयराने बिकिनी घालून वाढदिवस साजरा केल्यामुळे त्याला आणि आयराला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. आता आपल्या मोठ्या बहिणीने आपल्या पतीला लिपलॉक केल्याने त्याचा हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतो आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *