Headlines

“आमची ताकद येणाऱ्या काळात दाखवून देऊ” विधानपरिषदेतील पराभवानंतर चंद्रकांत हंडोरेंचा इशारा | chandrakant handore said will show my power criticizes congress for legislative council election cross voting

[ad_1]

विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतफुटी झाल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर क्रॉसवोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या सात आमदारांवर कारवाई करण्याचा इशारा पक्षश्रेष्ठींनी दिला होता. मात्र या पराभवनानंतर चंद्रकांत हंडोरे चांगलेच नाराज असून त्यांनी आपली खदखद आज व्यक्त केली. महाराष्ट्रात चंद्रकांत हंडोरे व्यक्ती नाही तर एक ताकद आहे. ही ताकद आम्ही येणाऱ्या काळात दाखवून देऊ, असा इशारा हंडोरे यांनी काँग्रेसला दिला. आज मुबंईत भिम शक्तीकडून राज्यव्यापी चिंतन शिबिर आोयजित करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान टीव्ही ९ मराठीशी बोलताना हंडोरे यांनी वरिल वक्तव्य केले.

हेही वाचा >> “तुमची बेसूर पिपाणी बंद करा,” संजय राऊतांवर भाजपाची बोचरी टीका

विधानपरिषद निवडणुकीत मी निवडून आलो असतो, तर मागासवर्गीयांचे प्रश्न विधानपरिषदेच्या व्यासपीठावर मांडू शकलो असतो. दलितांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडू शकलो असतो. पण दुर्दैवाने आमच्याच लोकांनी गडबड केल्यामुळे हे झालं. महाराष्ट्रात माझी आणि भिम शक्तीची ताकद किती आहे हे त्यांना माहिती नाही. काँग्रेस पक्षाला मोठी ताकद देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. पण राजकारणामध्ये माझ्यासारख्या दलित नेत्याला कटकारस्थान करुन काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. यामध्ये अनेकांचा हात आहे. पण महाराष्ट्रात चंद्रकांत हंडोरे ही व्यक्ती नव्हे तर ताकद आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. ही ताकद आम्ही येणाऱ्या काळात दाखवून देऊ,” असे चंद्रकांत हंडोरे म्हणाले.

हेही वाचा >> “मी फोन करत होतो पण…” फडणवीसांनी केला आरोप; राऊत म्हणाले “हा तर हा खोटारडेपणाचा कळस”, सरकार स्थापनेवरून पुन्हा घमासान

पुढे बोलताना काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉसव्होटिंग केल्यामुळेच माझा पराभव झाला, अशी खदखद हंडोरे यांनी बोलून दाखवली. “आमची भिमशक्ती नावाची संघटना आहे. गेली ५० वर्षे आम्ही दलित चळवळीत काम करत आहोत. आम्ही अन्याय अत्याचाराविरोधात लढाई करत आलो आहेत. काँग्रेस पक्षाने मला मोठी संधी दिलेली आहे. मला मंत्रिपद दिलं गेले. आमदार म्हणूनदेखील मी निवडून आलो. विधानपरिषेदेच्या निवडणुकीतही काँग्रेसने मला तिकीट दिलं होतं. पण काँग्रेसमधील काही आमदारांनी क्रॉसवोटिंग केल्यामुळे माझा पराभव झाला,” असेही हंडोरे म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *