अंबानींच्या मुलाची कृशा शाहसोबत कशी झाली भेट? पाहा फिल्मी लव्ह-स्टोरी


मुंबई : बिझनेसमन अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानीचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे. 20 फेब्रुवारी रोजी त्याने कृशा शाहसोबत लग्न गाठ बांधली आहे. दोघांनी विवाहगाठ बांधल्यानंतर त्याची प्रेमकहाणी कशी सुरु झाली याबाबत जाणून घेण्यात अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.

दोघांची ओळख त्यांच्या कुटुंबियांमुळेच झाली आहे. त्यांनंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांची भेट कुटुंबियांनी करुन दिली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी काही वेळ घेतला.

अनमोल आणि कृशा यांच्या एका कॉमन फ्रेंडने सांगितलं की, ‘अनमोलला कृशाचं तिच्या कामावरील प्रेम आणि डेडिकेशन खूप आवडलं. सोबतच कृशाने आपल्या भावासोबत एक ही कंपनी सुरु केली आहे. ती या कंपनीची CEO आहे.

Anmol Ambani And Krisha Shah Are Officially Married, Their 'Gathbandhan'  Moment Looks Surreal

पहिल्या भेटीनंतर दोघेही एकमेकांच्या संपर्कात होतेच. दोघांनी कामातून वेळ काढत पुन्हा भेटण्याचा प्लान बनवला. कृशा फुडी मुलगी आहे आणि तिची ही आवड तिला अनमोलच्या जवळ घेऊन गेली. दोघांच्या आवडी निवडी जुळल्या.

त्यांनी आपली खाद्य पदार्थांची आवड एकमेकांना सांगितली आणि सर्वात विचित्र पदार्थ कोणता टेस्ट केलायं का ? असं एकमेकांना विचारलं. लवकरच ते एकमेकांचे चांगले मित्र बनले.

त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं की दोघेही एकमेकांना पसंत करु लागले आहेत आणि त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवणं आवडत आहे.

खाण्याव्यतिरिक्त अनमोल अंबानी आणि कृशा शाह चित्रपटप्रेमी आहेत. चित्रपट आणि ओटीटी शो पाहायला दोघांना फार आवडतं.

दोघांच्या बॉण्डिंग बाबत अधिक सांगताना त्यांचा मित्र म्हणाला, ‘ते अनेकदा एकमेकांना कोणता नवा सिनेमा पाहावा, याबाबत सुचवतात. एवढेच नाही तर दोघेही आपल्या कॉमन फ्रेंड्ससाठी अनेकवेळा चित्रपटांचे स्क्रिनिंग ठेवतात.

 

 

 Source link

Leave a Reply