Headlines

अलिबाग: लाचखोर तहसिलदारांना पोलीस कोठडी

[ad_1]

अलिबागच्या लाचखोर तहसिलदार मिनल दळवी आणि त्यांचा हस्तक राकेश चव्हाण याला विशेष सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोळगाव येथील बक्षीसपत्राने दिलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर नाव चढविण्यासाठी दोन लाखांची लाच घेतल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा- “आम्ही लंबी रेस के घोडे”, ‘भारत जोडो’ यात्रेत आदित्य ठाकरेंचं विधान; त्यात चुकीचं काय? यात्रेतील उपस्थितीवरुन विचारला सवाल

नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी संध्याकाळी ही कारवाई केली होती. रात्री उशीरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दळवी यांना अटकेची कारवाई केली. यानंतर दुपारी एकच्या सुमारास त्यांना अलिबाग येथील विशेष सत्र न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी शासकीय अभिव्योक्ता म्हणून अँड भुषण साळवी यांनी तर आरोपींच्या वतीने अँड प्रविण ठाकूर यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

घरझडतीत सापडले साठ तोळे सोनं….

लाचखोरीच्या प्रकरणात अटक केल्यानंतर तहसिलदार मिनल दळवी यांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी दळवी यांच्याकडे ६० तोळे सोने आणि १८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यांच्या मुंबई येथील घराची झडती घेण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे. घरझडती सुरु आहे.

हेही वाचा- जितेंद्र आव्हाडांच्या अटकेवरून एकनाथ शिंदेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकीय…”

काय आहे प्रकरण?

कोळगाव हद्दीतील एका जमिनीच्या बक्षिसपत्राने दिलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर नाव नोंदणीचे प्रकरणी अलिबाग तहसिलदार कार्यालयात प्रलंबित होते. बरेच दिवस हे प्रकरण तहसिलदारांनी रेंगाळत ठेवले होते. या प्रकरणात दाखल अपिलाचा निकाल तक्रारीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी, तसेच सातबाऱ्यावर नोंदीसाठी तहसिलदार दळवी यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर २ लाख देण्य्याचे ठरले. सदर रक्कम हस्तक राकेश चव्हाण याच्याकडे जमा करण्यास सांगीतले. शुक्रवारी रायगड बाजार समोरील एका दुकानात हस्तकाने ही रक्कम स्विकारली. यावेळी नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्याला ही रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडले.

हेही वाचा- “वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की…”, गजानन किर्तीकर शिंदे गटात गेल्यानंतर अरविंद सावंतांचं टीकास्र!

लाचखोरीसाठी होतोय हस्तकांचा वापर

शासकीय कार्यालयातील लाचखोरी हा काही नविन विषय नाही. मात्र अलीकडच्या काळात लाचखोरीच्या प्रकरणात खाजगी हस्तकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. शासकीय कार्यालयात खाजगी हस्तक नेमून अधिकारी त्यांच्यामार्फत लाचेची रक्कम स्विकारत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. कायदेशीर कारवाईच्या कचाट्यातून स्वताची सुटका करण्यासाठी या हस्तकांचा वापर केला जात आहे. अधिकारी बदलून गेले तरी हे हस्तक नियमितपणे नवीन अधिकाऱ्यांची सेवा करतांना दिसत आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *