Alia Vs Ranbir ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘हार्ट ऑफ स्टोन’ एकाच दिवशी झळकणार पडद्यावर


Alia Bhatt and Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि त्याची पत्नी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल पैकी एक आहेत. (Popular Celebrity Couple) आलिया आणि रणबीरनं सगळ्यात शेवटी ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटात काम केले. नुकतंच आलियानं तिच्या मुलीला (Raha Kapoor) जन्म दिला. लवकरच आलिया आणि रणबीर मोठ्या पडद्यावर एकमेकांना टक्कर देणार आहेत. आलियाचा ‘हार्ट ऑफ स्टोन’ (Heart Of Stone) हा चित्रपच आणि रणबीरचा ‘अॅनिमल’ (Animal) या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा समोर आल्या आहेत. 

गेल्या वर्षी आलियानं ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटाचं शूटिंग केलं. याच चित्रपटातून आलिया हॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. शूटिंग करत असतानाच आलियानं तिच्या प्रेग्नंसीची गोड बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅट फॉर्मवर (Netflix Ott Platform) प्रदर्शित होणार आहे. 

याच दिवशी म्हणजे 11 ऑगस्ट रोजी रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. रणबीरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप वंगा रेड्डी यांनी केले आहे. दरम्यान, हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. 

हेही वाचा : VED Box Office Collection ‘वेड’ नं 50 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर Riteish Deshmukh ची खास पोस्ट व्हायरल

आलिया आणि रणबीर दोघांचेही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्यानं आता त्यांच्या चाहत्यांना प्रश्न आहे की दोघांपैकी कोणत्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात येईल. रणबीरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटात त्याच्या व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna), तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आणि बॉबी देओल (Bobby Deol) यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘हार्ट ऑफ स्टोन’ मध्ये गॅल गॅडोत (Gal Gadot), जेमी, आलिया भट्ट व्यतिरिक्त सोफी ओकोनेडो, मॅथियास श्वेघोफर, झिंग लुसी आणि पॉल रेडी देखील आहेत. 

दरम्यान, काही दिवसांपासून आलिया दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या बातम्या सुरु झाल्या आहेत. आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये आलियानं शेअर केलेल्या फोटोमध्ये आलियानं दोन फूलं हातात धरली असून तिच्या चेहऱ्यासमोर दिसत आहेत. ही दोन फूलं काही तरी महत्त्वाचे दर्शवत आहेत. इतकंच काय तर आलियानं फोटोला कॅप्शन देत 2.0 Stay Tuned असे कॅप्शन दिले आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की आलिया पुन्हा एकदा प्रेग्नंट असून राहासाठी लहान भाऊ किंवा बहीण येणार आहेSource link

Leave a Reply