लग्नानंतर Alia का होतेय सोशल मीडियावर ट्रोल? Kangana Ranaut शी याचा काय आहे संबंध?


मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं नुकतंच लग्न झालं आहे. हे बॉलिवूडचे हे पॉवर कपल अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. जे अखेर 14 एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले. ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. गुरुवारी लग्नानंतर आलिया-रणबीरने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि आपण लग्नबंधनात अडकल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले. आलिया-रणबीरच्या लग्नात सगळ्यात चर्चेचा विषय ठरला तो, त्या दोघांचा ही लूक. या दोघांनीही आपल्या लग्नासाठी खूप वेगळ्या रंगाचे पोशाख निवडले होते. आलियाने ऑफ व्हाइट रंगाचा लेहेंगा घातला होता आणि रणबीरने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. या कपड्यांमध्ये दोघेही खूप सूंदर दिसत होते अगदी ‘मेड फोर इच अदर’.

लग्नात आलिया खूपच सुंदर दिसत होती. तिने इतर सेलिब्रिटींप्रमाणे भडक कपडे आणि हेवी मेकप केला नव्हता.

उलट तिने सगळ्यात सिंपल हेअर स्टाईल ठेवली होती आणि नो मेकअप-मेकअप लूक तिनं केला होता. या साध्या सुध्या वेषात आलियाचे फक्त स्माईलनं सगळ्यांच लक्ष आपल्याकडे वेधलं.

परंतु आता आलिया तिच्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर ट्रेल होऊ लागली आहे आणि याचं कारण आहे कंगना राणौत.

बॉलिवूडमधील लोकांना काहीही बोलण्यासाठी अभिनेत्री कंगना कधीही मागेपुढे पाहात नाही, ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. परंतु ती आता चर्चेत आली आहे ती, तिच्या आणि आलियाच्या लूकमुळे.

हो आलियाचा जो लग्नातील लूक होता, तो कंगनाने यापूर्वी तिच्या भावाच्या लग्नात केला होता. ज्याचा फोटो देखील व्हायरल होत आहे.

आलिया आणि कंगणाचा फोटो जर तुम्ही पाहिला, तर तुमच्या लक्षात येईल दोघांच्या साडिच्या रंगापासून ते त्यावरील डिझानपर्यंत सगळंच सारखं आहे. एवढंच काय तर आलियाचा नेकलेस हा देखिल जवळ-जवळ कंगनाच्या नेकलेस सारखाच दिसत आहे. त्याच्या रंगापासून ते डिझाइनपर्यंत समान दिसत आहेत.

ज्यामुळे बॉलिवूडच्या लाडक्या आलियाने कंगणाच्या कपड्यांना कॉपी केलं आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. ज्यामुळे आलिया सोशल मीडियावर ट्रोल देखील होत आहे.

तर अनेकांकडून सब्यसाची वरती टीका होत आहेत.

खरं तर आलियाने सब्यसाचीचे डिझाइन आउटफिट घातले आहेत. तर मीडियारिपोर्ट्सनुसार कंगनाने देखील सब्यसाचीचाच आउटफीट घातला होता. त्यामुळे सारखेच कपडे डिझाइन करण्याची चूक त्यांच्या डिझायनरकडून घडली आहे. त्याने दोघींनाही सारख्या रंगाचा आणि डिझाइनचा आउटफीट सुचवला.Source link

Leave a Reply