Alia सोबतच्या नात्याबद्दल रणबीरचं मोठं वक्तव्य: म्हणाला, ”मला काही घेणं देणं नाही कारण…”


Ranbir Kapoor and Alia Bhatt: लोकांना रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी (Alia and Ranbir) खूप आवडते. या वर्षी एप्रिलमध्ये दोघांनी लग्नाच्या गाठ बांधली. यानंतर काही वेळातच आलियाने तिच्या गरोदरपणाची बातमी (Alia Bhatt Pregnancy News) देत सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. त्याच वेळी, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, आलिया आणि रणबीर यांनी त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने सांगितले आणि रणबीरने उघड केले की तो त्याच्या दैनंदिन जीवनासाठी आलियावर खूप अवलंबून आहे. 

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रणबीर आणि आलियाला विचारण्यात आले की, ते खऱ्या आयुष्यातही एकमेकांवर अवलंबून आहेत का? रणबीरने उत्तर दिले की, ‘मी खूप स्वतंत्र आहे पण खरंच मी आलियावर खूप अवलंबून आहे.

रणबीर पुढे म्हणाला, ‘मला आलिया कुठे आहे हे माहीत नसते तर मी जेवत नाही, बाथरूममध्येही जात नाही. तिनं माझ्यासोबत असणं माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. आपण काहीतरी रोमँटिक बोलत आहोत किंवा काही करत आहोत की नाही यानं काहीच फरक पडत नाही. पण तिनं माझ्या शेजारीच बसायला हवं.

त्याचबरोबर आलिया म्हणाली की, ‘रणबीर माझ्याशिवाय काहीही करू शकत नाही हे खरे आहे. मी आजूबाजूला नसले तर शेवटच्या क्षणी रणबीर सर्व काही सोडून देतो.”

रणबीर आणि आलिया हे लवकरच आईबाबा होणार आहेत. एप्रिल 2022 मध्ये आलिया आणि रणबीरचे लग्न झाले त्यानंतर जूनमध्ये तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून तिच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांना दिली. रणबीर आणि आलिया भट्ट नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन – शिवा’ (Bramhastra) या चित्रपटात पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते.

 अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर रणबीर आणि आलियाचा रोमान्स सुरू झाला. त्याचबरोबर या चित्रपटाने जगभरात 300 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

 पहिल्या आठ दिवसांतच रणबीर-आलियाच्या चित्रपटाने भारतात 184 कोटींची कमाई केली होती. 2025 मध्ये ‘ब्रह्मास्त्र’चा दुसरा भाग – ‘देव’ रिलीज होणार आहे.Source link

Leave a Reply