आलिया-रणबीरच्या लग्नाआधी ‘तो’ व्हिडीओ समोर


मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर आता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कधी लग्न करणार? या प्रतीक्षेत चाहते आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर रणबीर आणि आलियाने नात्याला नवं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया आणि रणबीर एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. 

रोज त्यांच्या लग्नाबद्दल नवे अपडेट्स समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी  या जोडप्याच्या लग्नाच्या तारखेपासून ते लग्नाच्या ठिकाणापर्यंतची माहिती समोर आली आहे. पण आता लग्नाच्या  ठिकाणाबाबत एक नवीन बातमी समोर आली आहे.

आलिया (Alia Bhatt) आणि रणबीर (Ranbir Kapoor) यांचं लग्न आरके बंगल्यात होणार असल्याचं समोर आलं. याचं ठिकाणी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि नितू कपूर यांचं देखील लग्न झालं होतं. 

पण आता लग्नाचं ठिकाण बदलंल असल्याची माहिती समोर येत आहे.  बॉम्बे टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरने त्याच्या वास्तू बिल्डिंगमध्ये 8 दिवसांसाठी बँक्वेट हॉल बुक केला आहे.

या दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलिया भट्टचा स्टाफ दिसून येत आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

दरम्यान, आलिया आणि रणबीरने लग्नाची तयारी सुरू केली आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण एका साडी फॅशन ब्रँड आणि डिजायनरसोबत आलिया आणि रणबीरचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.Source link

Leave a Reply