Headlines

Alia Bhatt Pregnant : आलिया गरोदर असल्याचं कळताच Condoms कंपनीनं असं काही म्हटलं की रणबीरही तोंड लपवेल

[ad_1]

Alia Bhatt Pregnant: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी, आलिया भट्ट ही जोडी लग्नानंतरच्या आयुष्यात चांगलीच रमली. लग्नाला दोन महिने उलटून तिसऱ्या महिन्यात या नात्यानं पदार्पण केलेलं असतानाच आलियानं भन्नाट Good News दिली. (Bollywood Actress alia Bhatt Pregnant Durex condoms makes fun congratulates ranbir kapoor and wife)

आपण गरोदर असल्याचं म्हणत तिनं रुग्णालयातीलच एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये रणबीरही पाठमोरा बसलेला दिसत होता. आलियानं शेअर केलेल्या दुसऱ्या एका फोटोमध्ये सिंह, सिंहीण आणि त्यांचा छावा दिसत होता. 

तिथं आलियानं गरोदर असल्याचं जाहीर केलं आणि इथं तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली. फक्त आलियाच नव्हे, तर कपूर आणि भट्ट कुटुंबीयांना सर्वांनीच शुभेच्छा दिल्या. 

सोशल मीडियावर या जोडीकडून देण्यात आलेल्या गोड बातमीचं स्वागत काही भन्नाट मीम्स आणि तितक्याच विनोदी शुभेच्छांनी केलं. Condoms चा ब्रँड असणाऱ्या Durex नं या सेलिब्रिटी जोडीची फिरकीच घेतली. 

“महफिल में तेरी हम तो क्लियरली नहीं थे… बधाईयां”, असं त्यांनी एका पोस्टमध्ये लिहित आलिया- रणबीरला शुभेच्छा दिल्या. या जोडीच्या लग्नाच्या वेळीसुद्धा त्यांना अशाच शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. 

रणबीरच्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटातील ‘चन्ना मेरेया’ या गाण्याच्या ओळींचा आधार घेत ‘ रणबीर और आलिया.. महफिल में तेरे, हम न रहे जो, फन तो नहीं है.’ असं लिहिलं होतं. हीच ओळ काहीशी वेगळ्या अर्थानं फिरवत यावेळी Durex नं बी टाऊनच्या या गोड जोडीला शुभेच्छा दिल्या.  

तुम्हाला कशा वाटल्या या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा? 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *