Headlines

Alia Bhatt चा सावत्र भाऊ तिच्या लग्नाला मूकणार; तो आहे तरी कोण ?

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आता लग्नबंधनात अडकण्यासाठी सड्ड झाले आहेत. कोण म्हणतंय ही जोडी 17 एप्रिलला लग्नबंधनात अडकेल, तर कोण म्हणतंय 14 एप्रिलला आलिया आणि रणबीर त्यांच्या वैवाहिक नात्याची सुरुवात करतील. 

अद्यापही या जोडीकडून त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, एकंदर हालचाली पाहता लग्नघटीका समीप आलेली आहे हेच स्पष्ट होत आहे. 

आलियाच्या लग्नसोहळ्याला बरेच चेहरे दिसणार आहेत. यामध्ये कुटुंबीय आणि मित्रपरिवाराची हजेरी असणार आहे. पण, एक खास व्यक्ती मात्र या लग्नाला मुकणार असल्याचं दिसत आहे. 

ही खास व्यक्ती म्हणजे आलियाचा सावत्र भाऊ आणि महेश भट्ट यांचा मुलगा राहुल भट्ट. आलियाच्या लग्नासंदर्भातील मोठी माहिती नुकतीच समोर आली आहे. राहुलनंच माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिल्याचं म्हटलं जात आहे. 

आलिया आणि रणबीरच्या लग्नामध्ये सजावटीसोबत सुरक्षेचीही विशेष जबाबदारी घेण्यात आली आहे. मुंबईतील सर्वोत्तम सिक्युरिटी एजन्सी 9/11 कडे या लग्नाच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जवळपास 200 हून अधिकजणांची टीम इथं सुरक्षा व्यवस्था पाहील असं सांगण्यात आलं आहे. 

Ranbir Alia Wedding: आलिया भट्ट के सौतेले भाई नहीं कर पाएंगे एक्ट्रेस की शादी एंजॉय, करेंगे ये काम

RK Studio आणि वास्तू या दोन्ही ठिकाणी मोठा पहारा असणार आहे, यादरम्यान ड्रोनचाही वापर होणार असल्याची माहिती राहुलनं दिली आहे. थोडक्यात काय, तर कुठेच सुव्यवस्था डगमगू नये हेच या मंडळींचं लक्ष्य असेल. ही सर्व जबाबदारी पाहण्याचं काम आलियाच्या भावावर सोपवण्यात आलं आहे. 

परिणामी जबाबदारी पाहत असताना आलियाचा भाऊ तिच्या लग्नाला मुकेल असं म्हटलं जात आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *