Akshay Kumar विमानात सुंदर मुलींसोबत करतोय तरी काय?


मुंबई : रिकामा वेळ असेल तर अनेक लोक गेम खेळतात. त्यातील सर्वांच्या आवडतीचा गेम म्हणजे Ludo. अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) देखील फ्लाइटमध्ये Lodu खेळताना दिसला. पण Ludo खेळणं अभिनेत्याला महागात पडलं आहे. कारण अक्षयच्या ऑन-स्क्रिन बहिनींनी खेळ जिंकल्यानंतर महागड्या वस्तूंची मागणी केली. ऑन-स्क्रिन बहिनींसोबत  Lodu खेळणारा अक्षय सध्या आगामी ‘रक्षाबंधन’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

सिनेमा प्रदर्शनाचा दिवस जवळ येत आहे, तर दुसरीकडे सिनेमाची स्टारकास्ट दमदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. याच दरम्यान एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Instagram) तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अक्षय त्याच्या ऑन-स्क्रिन बहिनींसोबत लुडो खेळताना दिसत आहे. 

व्हिडीओमध्ये अक्षय को-स्टार्स सहजमीन कौर, दीपिका खन्ना, स्मृती श्रीकांत आणि सादिया खतीब यांच्यासोबत लुडो खेळताना दिसत आहे. शिवाय खेळ खेळताना तो बहिनींसमोर एक अट ठेवतो. 

अक्षय म्हणतो, ‘मी जिंकलो तर तुम्ही रोज मला घरुन जेवनाचा डब्बा आणायचा आणि तुम्ही जिंकल्यातर माझ्याकडून शॉपिंग…’ अखेर खेळात अक्षय हारतो आणि सर्व बहिनींना शॉपिंगसाठी घेऊन जातो. 

स्मृती श्रीकांतने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ‘हैदराबादमध्ये आलात आणि मोत्याची शॉपिंग होणार नाही! थँक्यू लाला जी @अक्षयकुमार’ आमच्यासाठी हे सुंदर मोत्याचे हार खरेदी करण्यासाठी. @akshaykumar सरांची पहिली भेट म्हणून नेहमी स्मरणात राहील.”

अक्षय कुमारचा आगामी ‘रक्षाबंधन’ सिनेमा 11 अगस्त 2022 लो रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. Source link

Leave a Reply