अखेर Virat Kohli क्रिकेटमधून घेणार ब्रेक? ट्विटमुळे चर्चेला उधाण


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट फार शांत होते. आयपीएलमध्ये देखील बंगळुरूचं कर्णधारपद सोडून फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याला चांगला खेळ करता आलेला नाही. गेल्या दोन सलग सामन्यांमध्ये विराट शून्यावर बाद झाला आहे. यामुळे सोशल मीडियावरून कोहलीवर सातत्याने टीका करण्यात येतेय. 

यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीचा फॉर्म हा मोठा चर्चेला विषय आहे. आयपीएलच्या पंधराव्या सिझनमध्ये कोहली एका मॅचमध्ये एक रन काढून आऊट झाला तर सलग दोन मॅचमध्ये गोल्डन डक आऊट झाल्याची नोंद आहे. यानंतर आता सोशल मीडियावर विराट कोहली क्रिकेटमधून ब्रेक घेणार का अशा चर्चा रंगल्या आहेत. 

सोशल मीडियावर काही युझर्सने विराटची खिल्ली उडवली आहे. एकाने, टीव्ही तरी सुरु करू दे विराट, असं म्हणत विराटला ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. तर दुसरीकडे एका युझरने विराट कोहलीला ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे.

तर एका युझरने विराटला टीममधून बाहेर करावं, असं सूचवलं आहे. याशिवाय विराट कोहलीचा त्याच्या करियरमधील सर्वात वाईट काळ सुरु असल्याचं चाहत्यांनी म्हणत त्याला पाठिंबा दिला आहे. 

दरम्यान विराट कोहली सतत क्रिकेटप्रेमींची निराशा करत असल्याने त्याला आणि अनुष्काला ट्रोल देखील केलं जातं आहे. मात्र कोहलीची बॅट शांत राहण्यामागे एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. कोहलीच्या फ्लॉप शोवर आरसीबीच्या कोचकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. 

बंगळुरूचे प्रमुख संजय बांगर विराट कोहलीच्या बचावासाठी उतरले. कोहली जेवढं शक्य आहे तेवढं सगळं करतोय मात्र असा एक टप्पा असाही येतोच त्यामुळे कोहली या टप्प्यातून देखील नक्की बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.Source link

Leave a Reply