अखेर रिलेशनशिपवर शक्कामोर्बत? Ruturaj Gaikwad च्या नात्यावर Sayali Sanjeev जरा स्पष्टच बोलली!


Ruturaj Gaikwad,Sayali Sanjeev: महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) तालमीत तयार झालेला, चेन्नई सुपर किंग्सचा स्टार (CSK) आणि महाराष्ट्राचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) आज भीम पराक्रम दाखवला. ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत (vijay hazare trophy) तुफानी खेळी केली. उत्तर प्रदेशविरूद्ध दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad Record) झंझावाती डबल सेच्यूरी ठोकली. यावेळी त्याने एकाच ओव्हरमध्ये 7 सिक्स देखील (Ruturaj Gaikwad 7 Six) खेचले. त्यामुळे ऋतुराज आज सर्वत्र झळकताना दिसतोय. अशातच आता ऋतुराज पुन्हा चर्चेत आलाय तो (Sayali Sanjeev) अभिनेत्री सायली संजीवमुळे… (vijay hazare trophy ruturaj gaikwad rumored girlfriend sayali sanjeev talk about relationship Marathi News)

गेल्या काही वर्षांपासून ऋतुराज गायकवाड आणि मराठी लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव रिलेशनशिपमध्ये (Sayali Ruturaj Relationship) असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आयपीएल सामने सुरू असताना सायली संजीवने एक वनपीसमधला फोटो शेअर केला होता. त्यावेळी ऋतुराजने हार्ट इमोजी कमेंट केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली. एकीकडे आयपीएल सामने रंगत होते, तर दुसरीकडे ऋतुराज आणि सायली रिलेशनशिपच्या चर्चा.

अशातच एका कार्यक्रमात बोलताना सायलीने दोघांच्या नात्यावर स्पष्टचं सांगितलं आहे. मी आणि ऋतुराज फार चांगले मित्र (Sayali Ruturaj Friendship) आहोत. खरं सांगायचं तर, आयपीएल (IPL) खेळणाऱ्यांपैकी दोन-तीन माझे चांगले मित्र आहेत. त्यात ऋतुराज आहे, तुषार देशपांडे आहे…माझी काही दिया परदेस ही मालिका त्यांना फार आवडायची, असं ती म्हणाली. त्यानंतर मेन मुद्दयाकडे वळताना, एकतर ते तिघेही माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, असं सायली (Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad) म्हणाली.

आणखी वाचा  – Ruturaj Gaikwad Record : ऋतुराज गायकवाडचा ‘भीम पराक्रम’! ‘हे’ पाच मोठे रेकॉर्ड ब्रेक

दरम्यान, जास्त काही न बोलता, सायलीने उत्तरं देताना टाळाटाळ केली. त्यामुळे चाहत्यांना मनात अजूनही शंका कायम आहेत. मात्र, सध्या सायलीचा गोष्ट एका पैठणीची (Gost Aka Paithnichi) हा चित्रपटाची एकच चर्चा होताना दिसत आहे. लवकरच हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सायलीचे फॅन्स तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.Source link

Leave a Reply