अखेर कारण समोर; अनुष्का शर्माने ‘या’ कारणामुळे सोडली प्रोडक्शन कंपनी


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा एक यशस्वी अभिनेत्री तसंच एका मुलीची आई आहे. 2017 मध्ये अभिनेत्रीने विराट कोहलीसोबत लग्न केलं. लग्नानंतर ही अभिनेत्री झिरो चित्रपटात दिसली होती. झिरो या चित्रपटानंतर अभिनेत्री अनेक वर्षे पडद्यापासून दूर राहिली. अनुष्का शर्मा ही प्रसिद्ध अभिनेत्री तसंच चित्रपट निर्माती आहे.

2015 मध्ये या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत NH 10, फिल्लौरी, परी, पाताल लोक, बुलबुल सारखे अनेक चित्रपट आणि वेब सीरीज बनवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, अनुष्काने 19 मार्च 2022 रोजी व्यावसायिक जीवनाशी संबंधित एक मोठी घोषणा केली. तिने यापुढे चित्रपट निर्मिती करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. म्हणजेच, तिने तिच्या ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

ही जबाबदारी ती पूर्णपणे भाऊ कर्णेश शर्मावर सोपवत असल्याचंही तिने स्पष्ट केलं. आता पहिल्यांदाच अनुष्का शर्माच्या भावाने या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सांगितलं की, अनुष्का शर्माने प्रोडक्शन हाऊस सोडण्यामागचं खरं कारण काय होतं?

दिलेल्या एका मुलाखतीत कर्णेशने सांगितलं की, अनुष्का शर्माने ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ची पायाभरणी केली होती. या संपूर्ण कार्यात तिचं मोठं योगदान आहे. सध्या ती तिच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांतून जात आहे. आम्ही त्याचा आदर करतो. पण ती आमच्या आगामी ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यात ती अभिनय करणार आहे.

ती पुढे म्हणाली आहे की, अनुष्काचा प्राधान्यक्रम काळानुसार बदलला आहे. लग्नानंतर आणि आई झाल्यानंतर तिच्या आयुष्यात सतत बदल होत गेले. ती आता आई देखील आहे आणि या क्षणी ती तिची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. अनुष्का शर्मा आणि कर्णेश शर्मा भाऊ-बहिण आहेत. तो व्यवसायाने दिग्दर्शक आणि निर्माता आहे.

त्याने NH10 मधून पदार्पण केलं. अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव क्लीन स्लेट फिल्म्स आहे. अर्थात अनुष्का यापुढे फिल्ममेकिंग करणार नसून, हे प्रॉडक्शन हाऊस सतत काम करेल, जो तिचा भाऊ कर्णेश सांभाळेल. या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना 2013 साली झाली.Source link

Leave a Reply