Headlines

आजोबांना काही विचारलं तर ते उत्तर देतील का? मुलांचा प्रश्न ऐकताच जिनिलिया, म्हणाली…

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) आणि पती रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांचे लाखो चाहते आहेत. जिनिलिया ही सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत जिनिलिया चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच जिनिलिया देशमुखनं सोशल मीडियावर तिचे सासरे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) आणि तिची दोन्ही मुलं यांचा एक फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. जिनिलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

जिनिलियानं ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिची दोन्ही मुलं रियान आणि राहिल यांचा त्यांचे आजोबा विलासराव देशमुख यांच्या फोटोसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोत तिची मुलं त्या फोटोला नमस्कार करताना दिसत आहे. (Genelia Deshmukh Emotional Instagram Post)

आणखी वाचा : 90 सेकंदात रिक्षा चालकाला 17 वेळा महिलेने लगावली कानशिलात, धक्कादायक व्हिडीओ Viral

 

 

आणखी वाचा : राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, डॉक्टरांकडून मोठी अपडेट

या फोटोला तिनं दिलेलं कॅप्शन चर्चेचा विषय ठरला आहे.  प्रिय पप्पा, रियान आणि राहिलनं आज मला विचारलं, आई, आम्ही आजोबांना एखादा प्रश्न विचारला तर ते उत्तर देतील का? त्यांच्या या प्रश्नावर कोणतीही शंका मनात न ठेवता मी त्यांना म्हणाली, जर तुम्ही त्यांचे ऐकले तर ते तुम्हाला नक्कीच उत्तर देतील, असे जिनिलिया म्हणाली. 

आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर

पुढे जिनिलिया म्हणाली, ‘मी इतकी वर्षे प्रामाणिकपणे तुमच्याशी बोलण्याचा आणि प्रत्येक गोष्टींची उत्तरं मिळवण्यात घालवली आहेत. मला माहित आहे की तुम्ही आमच्या कठीण काळात आमच्यासोबत होतात आणि आनंदाच्या काळात आमच्यासोबत आनंदही व्यक्त केलात. मला माहित आहे की आमच्या प्रत्येक शंकांचे तुम्ही उत्तर दिले आणि मला चांगलंच माहितीय की, मी जे लिहित असते, ते तुम्ही वाचत असता.’

आणखी वाचा : ‘ज्या चित्रपटात शाहरुख खान तो फ्लॉपच’, सलमानच्या चाहत्यांचा Shahrukh ला विरोध

‘मला अजूनही आठवते की तुम्ही आम्हाला वचन दिले होते की, जर आम्ही तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवले तर तुम्ही कायम आमच्यासाठी उपलब्ध असाल. पप्पा तुमची आम्हाला खूप आठवण येते’, असे जिनिलिया या पोस्टमध्ये म्हणाली.

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने… 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, ‘वेड’ या मराठी चित्रपटातून जिनिलिया ही तब्बल १० वर्षांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश करत आहे. त्यासोबतच जिनिलिया ही ‘मिस्टर मम्मी’, ‘ट्रायल पिरीयड’ यासारख्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. जिनिलियानं हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *