Headlines

“सत्ताधारी पक्षाचे आमदार रिवॉल्व्हर काढून गोळीबार करायला लागले तर…”, अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया | Ajit Pawar criticize Shinde Fadnavis government over firing by Sada Sarvankar

[ad_1]

शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप झालाय. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत काळजी व्यक्त केली आहे. “एक आमदार रिवॉल्व्हर काढतो आणि गोळीबार करतो. हे असं कधीच नव्हतं,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसेच गोळीबाराचे आरोप खरे आहे की खोटे हे जनतेला कळालं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. ते आज (१२ सप्टेंबर) विधानभवनातील वार्ताहर कक्षात आयोजित विशेष पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न आहेत. गणशोत्सवाच्या काळात शिवसेना आणि शिंदे गटात ठिकठिकाणी राजकीय संघर्ष झाला. अधिवेशन संपल्यापासून कालपर्यंत या घटना घडत आहेत. एक आमदार रिवॉल्व्हर काढतो आणि गोळीबार करतो. हे असं कधीच नव्हतं. आपण हे असं बिहार, उत्तर प्रदेशमध्ये घडलेलो ऐकतो. मला बिहार, उत्तर प्रदेशची बदनामी करायची नाही. नाही तर पुन्हा तिथं माझा निषेध व्हायचा.”

“सत्ताधारी पक्षाचे आमदार रिवॉल्व्हर काढून गोळीबार करायला लागले तर…”

“आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे, असं नेहमी सांगतो आणि खुशाल सत्ताधारी पक्षाचे आमदार रिवॉल्व्हर काढून गोळीबार करायला लागले तर कायदा सुव्यवस्थेवर कुणाचं लक्ष आहे? गृहमंत्री काय करतात, मुख्यमंत्री काय करतात? सत्ताधारी पक्षाचे आमदार असं वागायला लागले तर पोलिसांनी काय भूमिका घ्यायची?” असा सवाल अजित पवारांनी केला.

“अजूनही त्यांच्या तोंडातून ठोकाठोकीची भाषा”

अजित पवार पुढे म्हणाले, “आम्ही कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यानंतर अजूनही त्यांच्या तोंडातून ठोकाठोकीची भाषा ऐकायला मिळते. अरेला कारे म्हणा, अमकं करा तमकं करा, आम्ही तुमच्या मागे आहोत, असं आवाहन कॅबिनेट मंत्री करतात. काय सुरू आहे, कशा पद्धतीचा कारभार सुरू आहे? काही गोष्टी यांनी लक्षात घेतल्या पाहिजे. गांभीर्य हा प्रकारच यांच्यात राहिलेला नाही.”

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला अंगणवाडी सेविकांना हजर राहण्याचे आदेश, अजित पवार म्हणाले, “गर्दी जमवण्यासाठी ही वेळ आली असेल तर…”

“गोळीबाराचे आरोप खरे की खोटे हे लोकांना कळलं पाहिजे”

“राज्यात अनेक गंभीर प्रश्न असताना पुणे, मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होत आहे. हा संघर्ष पेटवण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. मुंबईत आमदाराने गोळीबार केल्याचा आरोप होत आहे. ते खरं की खोटं हे लोकांना कळलं पाहिजे. राज्यातील स्थिती अस्थिर आणि चिघळत ठेवणं पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला कदापि परवडणारं नाही,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *