Headlines

राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार का? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले… | ajit pawar said there will no mid term election in maharashtra

[ad_1]

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेपक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनाना द्यावा लागला. या सत्तासंघर्षानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विराजमान झाले. दरम्यान, या सरकाचा मंत्रीमंडळ विस्तार बाकी असून हे सरकार उरलेले अडीच वर्ष टीकणार का? राज्यात पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुका लागणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत. असे असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्यावधी निवडणुकांवर भाष्य केले आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची अजिबात शक्यता नाही, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा >>> शरद पवारांनी ‘शिवेसना फोडली’ म्हणणाऱ्या केसरकरांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “आम्हीच तिकीट देऊन…”

“मध्यावधी निवडणुका लागण्याचं काहीही कारण नाही. पूर्ण बहुमत असणारं सरकार याआधीही होतं. आता त्यांनी काहीतरी तोडफोड करुन सरकार स्थापन केलंय. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकीय चित्र खऱ्या अर्थाने स्पष्ट होईल,” असे अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “…तर पुढे काय होणार हे महाराष्ट्राने पाहावं,” पत्रकार परिषदेतील ‘त्या’ घटनेनंतर अजित पवार यांची शिंदे-फडणवीसांवर टीका

यावेळी बोलताना त्यांनी राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “मंत्रीमंडळाचा विस्तार कधी करायचा, हा अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो. सर्व विभागांना मंत्री आणि राज्यमंत्री नेमले गेले तर काम लवकर होते. सचिवांना, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात. बैठका सुरु होतात, आढावा घेता येतो. या माध्यमातून अडचणी दूर करता येतात. सध्या सगळा भार या दोघांच्याच खांद्यावर आहे. यामागचे गमक काय याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सांगू शकतील. १६५ आमदारांचं पाठबळ विश्वासदर्शक ठरावात मिळाले असताना मंत्रीमंडळ विस्तार करण्यासाठी ते का घाबरत आहेत? त्यांना कोणी थांबवलं आहे? घोडं कोठे पेंढ खात आहे?” असे प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना केले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *