Headlines

ajit pawar mocks cm eknath shinde group mla rebel maharashtra politics



राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या मिश्किल आणि हजरजबाबी वृत्तीमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा भाषणात किंवा माध्यमांसमोर त्यांनी लगावलेले टोले किंवा दिलेल्या कानपिचक्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अनेकदा अजित पवर त्यांच्या अशा काही विधानांमुळे अडचणीत देखील आले आहेत. आज नियोजित कार्यक्रमानिमित्त नगरमधील श्रीगोंद्यात असणारे अजित पवार यांनी थेट व्यासपीठावरून बोलतानाच ‘एकदम ओक्के’ म्हणत एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचा उल्लेख केला आणि उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला!

एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतले तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. यचा पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत असताना अजित पवारांनी नगरच्या श्रीगोंद्यात बोलताना त्यावर टोलेबाजी केली. “हल्ली राजकारणात कधी काय घडेल, काही सांगता येत नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“हे एकदम ओक्केच झालं!”

“हल्ली राजकारणात कधी काय घडेल काही सांगता येत नाही. २० जूनपर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो. काय एका दिवशी त्यांच्या मनात आलं आणि गेले १५ लोकं घेऊन. काय आता तुम्ही.. हे एकदम ओक्केच झालं.. काय आता बोलायचं?” अशी खोचक टिप्पणी अजित पवारांनी करताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

“बाळासाहेबांनी त्याच शिवाजी पार्कवरून सांगितलं होतं, की इथून पुढे…”, अजित पवारांनी करून दिली ‘ती’ आठवण!

या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी भाजपा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठींवर देखील उपहासात्मक प्रतिक्रिया दिली. “याआधी गणेशोत्सव वर्षानुवर्ष चालत आले आहेत. पण कधीही मागच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुणी गणपतीच्या दर्शनाला कुणाच्या घरी गेले नाहीत. आम्हीही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. पण आम्ही त्यांच्यासारखे कॅमेरे बरोबर घेऊन जात नाही. पण आता प्रवेश करताना कॅमेरा लावला जातो. मग बरोबर गाडी थांबते, कुणीतरी उतरतं. ते आत जातात. नमस्कार करतात. कशाला?”, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

“पूर्वी राज कपूर शोमॅन म्हणून ओळखला जायचा, आता..”

“जो गणेशभक्त आहे, त्याने अशा पद्धतीने देखावा करण्याचं कारण नाही. तुम्ही तुमच्या मनात ठेवा ना. पण आता काहींना शो करण्याचीच सवय आहे. राज कपूर पूर्वी शोमॅन म्हणून ओळखला जायचा. तशी सवय काहींना आता लागली आहे. जनतेनंच बघावं काय चाललंय आणि काय नाही”, असंही अजित पवार म्हणाले.



Source link

Leave a Reply