Headlines

ajit pawar first reaction after cabinate expanssion news spb 94



उद्या राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पहिल्या टप्प्याच साधारणत: १५ ते १८ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते आहे. मात्र, विरोधी पक्षनेता म्हणून मला अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “सर्व बंडखोर आमदार वॉशिंग मशिनमध्ये…” टीईटी घोटाळ्यावरून किशोरी पेडणेकरांचं टीकास्र!

“विधानसभेच्या विरोधीपक्ष नेता या नात्याने मला आज पत्र मिळाले आहे. उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी विरोधीपक्षांची नावे देण्यासाठी हे पत्र मला प्राप्त झाले आहे. त्यामुळे उद्या या समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. तसेच विविध चॅनलच्या माध्यमातून मला मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत माहिती मिळाली आहे. मात्र, विरोधीपक्ष नेता म्हणून मला अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही”, अशी माहिती राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे.

“गेल्या बऱ्याच दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला होता. तो लवकर होईन, असचं सांगण्यात येत होत. मात्र, नुकताच त्यांना दिल्ली दौरा झाला आहे आणि आजही त्यांची बैठक झाली आहे. त्यामुळे उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते आहे.”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – उद्या महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार? राजकीय हालचालींना वेग

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी जाऊन बैठक घेतली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात जवळपास पावणे दोन तास चर्चा झाली आहे. यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. उद्या सकाळी ११ वाजता पहिल्या टप्प्यात काही मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे.



Source link

Leave a Reply