Headlines

Ajinkya Rahane | 3 बॉलमध्ये 3 वेळा आऊट, तरीही अजिंक्य रहाणे खेळत राहिला

[ad_1]

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 19 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने कोलकातावर 44 धावांनी विजय मिळवला. दिल्लीने कोलकाताला विजयासाठी दिलेल्या 216 धावांचे आव्हान दिले. मात्र कोलकाताची टीम 19.4 ओव्हरमध्ये 171 धावांवर ऑलआऊट झाली. या सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. (ipl 2022 match 19th kkr vs dc kolkata knight riders batsman ajinkya rahane controversy 3 time out in 1st over)

कोलकाताचा ओपनर आणि लोकल बॉय अजिंक्य रहाणे पहिल्याच ओव्हरमध्ये एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 वेळा आऊट झाला. मात्र यानंतरही रहाणे खेळत राहिला. नक्की काय किस्सा घडला, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

कोलकाताची वेंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे ही सलामी जोडी  216 धावांच्या विजयी आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आली. कोलकाताच्या डावातील पहिली ओव्हर मुस्तफिजुर रहमानने टाकली. या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलवर रहाणे आऊट झाला. या पहिल्या 3 बॉलमध्ये नक्की काय घडलं हे सविस्तर जाणूयात.  

मुस्तफिजुरने टाकलेला पहिला बॉल हा रहाणेच्या पॅडच्या वरच्या बाजूला लागून विकेटकीपर ऋषभ पंतच्या दिशेने गेला. पंतने कॅच आऊटसाठी जोरदार अपिल केला. 

अंपायर मदन गोपालने रहाणे कॅच आऊट बाद केलं. मात्र रहाणेने अंपायरच्या या निर्णयाला आव्हान देत डीआरएस घेतला. डीआरएसमध्ये रहाणे नॉट आऊट असल्याचं स्पष्ट झालं. अशा प्रकारे रहाणेला पहिल्यांदा जीवनदान मिळालं. 

दुसऱ्या बॉलवर मुस्तफिजुरने एलबीडबल्यूसाठी अपिल केली. अंपायरने झटक्यात आऊट दिलं. रहाणेनेही फटक्यात डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये बॉल बॅटला स्पष्टपणे टच झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे दुसऱ्यांदाही रहाणे नशिबवान ठरला. 

आता नशिब पण सारखं सारखं साथ देणार नाही. तिसऱ्या बॉलवर रहाणे खरच आऊट होता. मात्र यावेळेस दिल्ली टीमने माती खाल्ली. मुस्तफिजुरने टाकलेल्या तिसरा बॉल टाकला. 

ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल रहाणेने खेळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात बॅटला कट लागून बॉल विकेटकीपर पंतच्या दिशेने गेला. मात्र बॅटला कट लागल्याचं खुद्द पंतलाही समजलं नाही. त्यामुळे पंत आणि पूर्ण दिल्ली टीमने अपिल केली नाही. 

स्निकोमीटरमध्ये तपासल्यानंतर रहाणेच्या बॅटला बॉल लागल्याचं स्पष्टपणे दिसून आलं.  मात्र खेळाडूंना काही न समजल्याने रहाणेला तिसऱ्यांदा जीवनदान मिळालं. 

मात्र रहाणेला या संधीचं सोनं करता आलं नाही. रहाणेने 14 बॉलमध्ये 1 फोरसह 8 धावा केल्या.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *