भर शूटिंगमध्ये अजय देवगनला संताप अनावर, समोर उभ्या आनंद महिंद्रा यांनाही धक्का


मुंबई : सहसा चारसौघात सेलिब्रिटी त्यांच्या संतापावर नियंत्रण ठेवतात. फक्त सेलिब्रिटीच नाही, तर आपणही चारचौघात वागताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवतो. पण, मग असे काही प्रसंग येताततच जेव्हा संतापाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या जातात. अभिनेता अजय देवगन याच्यासोबत सध्या असंच काहीसं घडलं. (Ajay Devgan Video)

म्हणजे अजय इतका संतापला की, त्याचं हे रुप पाहून महिंद्रा उद्योग समुहाचे प्रमुख असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनाही धक्का बसला. 

खुद्द  महिंद्रा यांनीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. महिंद्राच्याच जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यानचा हा व्हिडीओ. 

वारंवार स्क्रीप्टमध्ये केले जाणारे बदल पाहून अजय नाराज होताच आणि अखेर त्याचा संताप बाहेर पडला. 

एकसारखी स्क्रीप्ट का बदलताय, असं म्हणल्यावर सर एकसारखं नाही, फक्त चार वेळाच बदलली… असं उत्तर मिळताच अजयचा पारा चढतो; असं या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. 

मला असं सांगण्यात आलं, की अजय देवगनला फारच राग आला, असं मी ऐकलं. तो आमचा एखादा ट्रक घेऊन येण्याआधी हेच चांगलं असेल की मी हे शहर सोडून पळून जातो… 

तुम्हाला माहितीये? 
अजय देवगन, महिंद्रा एँड महिंद्रा बसचा ब्रँड अँम्बेसेडर आहे. काही महिन्यांपूर्वीच आलेल्या जाहिरातीमध्ये तो काही धमाकेदार स्टंट करताना दिसला होता. 

आता त्याचा हा संताप खरंच आहे, की आणखी काही वेगळ्या रुपात हे प्रकरण आपल्या समोर येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Source link

Leave a Reply